राहुरी येथे आम्ही सावित्रीच्या लेकी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी येथे आम्ही सावित्रीच्या लेकी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

राहुरी(वेबटीम)  सावित्रीबाई फुले जयंती व बाळशास्त्री जांभेकर जयंती पत्रकार दिनाचे औचित्य साधून रमाई बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्...

राहुरी(वेबटीम)



 सावित्रीबाई फुले जयंती व बाळशास्त्री जांभेकर जयंती पत्रकार दिनाचे औचित्य साधून रमाई बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राहुरी येथे आम्ही सावित्रीच्या लेकी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष स्नेहल सांगळे यांनी दिली. 

प्रसिद्धी पत्रकात सांगळे यांनी म्हंटले आहे की, नारी तू घे उंच भरारी, फिरून पाहू नकोस माघारी हे ब्रीद अंगीकारून रमाई बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून राज्यभर महिलांचा मान, स्वाभिमान, राहणीमान उंचावण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. त्याचात एक भाग म्हणून कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय, प्रशासकीय आदी क्षेत्रात आपल्या कामाच्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त करणाऱ्या महिलांचा मान्यवराच्या उपस्थितीत आम्ही सावित्रीच्या लेकी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

गुरुवारी  (दि. ०५) रोजी राहुरी येथील गाडगेबाबा आश्रम शाळेच्या सभागृहात दुपारी ०४.०० वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांचे स्वीय सहायक प्रविण मोरे, समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, राहुरीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, तहसीलदार एफ. एस. शेख, नायब तहसीलदार पुनम दंडिले, साईधाम हॉस्पिटलचे डॉ. स्वप्नील माने यांसह चंद्रकांताताई सोनकांबळे, एड. अभया सोनवणे, एड. आशा लांडगे, एड. सुनिता सोनवणे, श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, विजय वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड, भीमा बागुल, प्रदिप बनसोडे, विलास साळवे, गोविंद दिवे, पोपट नाना दिवे, सिमा बोरुडे, सुनिल चांदणे, सिद्धांत सगळगिळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष स्नेहल सांगळे, उपाध्यक्ष दत्तात्रय गडाख, सचिव सुरेंद्र सांगळे व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत