थोर स्वातंत्र्यसेनानी काॅ.पी.बी.कडू.पा.यांचा स्मृतिदिन सात्रळ येथे साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

थोर स्वातंत्र्यसेनानी काॅ.पी.बी.कडू.पा.यांचा स्मृतिदिन सात्रळ येथे साजरा

  सात्रळ(वेबटीम) येथील विकास सोसायटी नं-२ सात्रळ येथे थोर स्वातंत्र्यसेनानी कॉ.पी.बी कडू पाटील यांचा स्मृतिदिन संपन्न झाला.    याप्रसंगी काॅ...

 सात्रळ(वेबटीम)




येथील विकास सोसायटी नं-२ सात्रळ येथे थोर स्वातंत्र्यसेनानी कॉ.पी.बी कडू पाटील यांचा स्मृतिदिन संपन्न झाला.


   याप्रसंगी काॅ.पी.बी. कडू पाटील तथा आप्पांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी  कॉ. पी . बी. कडू पाटील  यांच्या स्मरणार्थ,  सामाजिक भावनेच्या जाणीव ठेवून कडू कुटुंबियांकडून "अंतिम रथ "लोकार्पण  करण्यात आला. वाड्या वस्त्या वरील ग्रामस्थाना अंत्ययात्रा साठी येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने "अंतिम रथ " चा उपयोग होणार  आहे. 

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे,उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी केले.यावेळी अरुण कडू यांनी जुन्या रूढी परंपरा तसेच प्रथा मोडीत काढून नव्या विचारांना आचरण्यात आणण्याची गरज असल्याचे नमूद केले तसेच आजही आपला समाज अंधश्रद्धेच्या अंधारातून प्रकाशात यायला तयार नसल्याची खंत आपल्या प्रास्ताविकेतव्यक्त  केले. 

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.गहिनीनाथ विखे पाटील होते.

      आप्पांच्या स्मृतिदिनानिमित्त कारभारी डुक्रे,ऍड. बाळकृष्ण चोरमुंगे,  अहमदभाई शेख, आणि पोपटराव पवार यांनी आपले विचार मांडत आप्पांच्या इतिहासातील आठवणींना उजाळा दिला.

      या कार्यक्रमासाठी आप्पांचे स्नेही कॉ. गंगाधर पाटील जाधव, लोणीचे सरपंच जनार्दन पाटील घोगरे,बाळासाहेब  केरुनाथ  विखे,  डॉ.जी.जे.विखे,ॲड विजयराव कडू,बबनराव कडू,शांती भाऊ गांधी, बाळकृष्ण चोरमुंगे,डॉ.के.के.बोरा, भास्करराव  फणसे, विठ्ठलदास असावा, वसंतराव  ब्राह्मणें, सात्रळ सोसायटी अध्यक्ष दिनकरराव कडू, किरण कडू, पंकज कडू,विक्रांत कडू,भैयाशेठ तांबोळी, पेटकर सर,  प्राचार्य किशोर ससाणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिराज मन्सुरी यांनी केले तर आभार विक्रांत कडू यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत