छत्रपती शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाची शुटींग बॉल संघाची राज्यस्तरावर निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

छत्रपती शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाची शुटींग बॉल संघाची राज्यस्तरावर निवड

  राहुरी(वेबटीम) महात्मा फुले विदयालय, दाढ बु येथे पार पडलेलया विभागीयस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अ...

 राहुरी(वेबटीम)



महात्मा फुले विदयालय, दाढ बु येथे पार पडलेलया विभागीयस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर या संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुटींग बॉल स्पर्धेमध्ये सोलापुर व पुणे संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरासाठी सुयश प्राप्त केले. तसेच २७७ विदयार्थी तालुका स्तरावर १३७ विदयार्थी जिल्हा स्तरावर, तीन संघ विभागासाठी पात्र तर एक संघाची राज्यस्तरावर निवड व तीन विदयार्थ्याची बॉल बॅडमिंटनसाठी राज्यस्तरावर निवड. तसेच प्रज्ञा संदीप गडाख या विदयार्थीनीची शुटींग बॉल स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.


तसेच बॉल बॅडमिंटन संघाने सोलापुर येथील मंगळवेढा या ठिकाणी पुणे विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने शुटींग बॉल स्पर्धेत पुणे विभागात दुसरा क्रमांक मिळविला. राज्यस्तरासाठी •बॉलबॅडमिंटन स्पर्धेसाठी तीन मुलांची निवड झाली. जिल्हयासाठी १३ संघ पात्र ठरले. भालाफेक स्पर्धेमध्ये गायकवाड ऋतुजा शरद या विदयार्थीनीची पुणे विभागासाठी निवड झाली.


वरील विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री कुळधरण आर बी व श्री भांड जी. एस. यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबददल संस्थेचे अध्यक्ष माजी आ. नंदकुमार झावरे , सेक्रेटरी खानदेशे व सर्व पदाधिकारी तसेच माजी आ. चंद्रशेखर पा. कदम यांनी सर्व यशस्वी विदयार्थ्याचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सर्व यशवंत विदयार्थ्याचे अभिनंदन विदयालयाचे प्राचार्य श्री. चव्हाण बी. जी., उपप्राचार्य श्री अल्हाट एस. जी. पर्यवेक्षक श्री. काळे एन.बी. श्री. भालेकर आर जे समन्वयक श्रीम. शिंदे एस.ए. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. नितीन पा. वाळुंज, सहसचिव श्री. अनंत पा. कदम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुनिल पा. भांड, उपाध्यक्ष श्रीम. अर्चनाताई भालेकर व सर्व सन्माननीय सदस्य याचबरोबर गावातील मान्यवर व विविध पदाधिका-यांनी विदयार्थ्याचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत