कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री मयुरेश्वर गणपतीचे दर्शन काल सरला बेटचे मंहंत रामगिरी महाराज यांन...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री मयुरेश्वर गणपतीचे दर्शन काल सरला बेटचे मंहंत रामगिरी महाराज यांनी अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने घेतले. श्री गणेश मंदिर ट्रस्ट पोहेगाव च्या वतीने दीपक रोहमारे यांनी महाराजांचा सन्मान करत त्यांचा सत्कार केला.
यावेळी मधु महाराज, राजेंद्र कोल्हे, देवेन रोहमारे,लखन घारे, विनोद रोहमारे, राजेंद्र ढवळे, सागर रोहमारे, अजय रोहमारे, सुनील रोहमारे, भगिरथ रोहमारे, किरण रोहमारे, निलेश साळुंके, नंदू रोहमारे, संजय वाघ आदी उपस्थित होते.
मध्यरात्रीपासूनच नाशिक नगर औरंगाबाद येथील गणेश भक्त श्री मयुरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. हजारो भाविकांनी काल श्रींचे दर्शन घेतले.संजीवनी ब्लड बँक कोपरगाव यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. वत्सलाबाई गोविंद कोते यांच्या स्मरणार्थ शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या वतीने आलेल्या गणेश भक्तांना उपवास निमित्त खिचडीचे फराळ वाटप करण्यात आले. गणेश भक्त भडांगे यांनी देखील खिचडी फराळ वाटप केले.श्री गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने आलेल्या भाविकांना दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मंदिराभोवती रंगरंगोटी व दिव्य रोषनाई करण्यात आली होती. ट्रस्टच्या वतीने 101 लिटर दूध उपलब्ध करत चहा वाटप करण्यात आला. मंहंत रामगिरी महाराज यांनी येथील नियोजन बघुन मंदिर ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत