राहुरी फॅक्टरी(वेबटीम) कणगर ग्रामपंचायत येथे माहे २०२३ अखेरची घरपट्टी व पाणी पट्टी जमा करणाऱ्या कुटुंबातील महिलांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
कणगर ग्रामपंचायत येथे माहे २०२३ अखेरची घरपट्टी व पाणी पट्टी जमा करणाऱ्या कुटुंबातील महिलांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी झेंडावंदन करून साडी चोळीचा मान देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे सरपंच सर्जेराव घाडगे यांनी सांगितले.
कणगर गावात माहे २०२३ अखेर पर्यंतची घरपट्टी व पाणीपट्टी ज्यांनी भरली. त्या सर्वांचा लकी ड्रॉ सोडत ज्याची चिठ्ठी निघाली त्यांच्याच हस्ते २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा निर्णय मासिक सभेत घेण्यात आला.
त्यानुसार घरपट्टी व पाणीपट्टी अदा करण्यांची लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली. तर भगवान विठ्ठल नालकर यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची पत्नी सरस्वती नालकर यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण होणार असून त्यानंतर साडी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे सरपंच घाडगे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत