राहुरी(वेबटीम) महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या निमंत्रित संचालक पदी साई आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांची...
राहुरी(वेबटीम)
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या निमंत्रित संचालकपदी साई आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांची निवड झाली आहे
शिवाजीराव कपाळे यांनी पतसंस्थांच्या माध्यमातून गेली 29 वर्षे आपल्या कामाचा ठसा आर्थिक क्षेत्रात उमटविला आहे. त्यामुळे आर्थिक क्षेत्रातील एक अभ्यासु व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख झाली आहे. त्याचबरोबर सर्वसमावेशक स्वभाव गुणामुळे साई आदर्श मल्टीस्टेटने अगदी थोड्या कालावधीमध्ये यशाची उतुंग भरारी घेतली आहे. त्यांच्या या आर्थिक क्षेत्रातील अनुभवाचा फायदा इतर पतसंस्थानाही व्हावा, या उद्देशाने राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व संचालक मंडळ यांनी शिवाजीराव कपाळे यांची फेडरेशनच्या संचालक पदी निवड केली आहे. या निवडीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
निवडीनंतर कपाळे म्हणाले पतसंस्था चळवळीला बळ देण्याचे दृष्टिकोनातून काम करून या संस्था अधिकाधिक कशा भरभराटीस येतील याकडे विशेष लक्ष दिले जाईल. ग्रामीण भागामध्ये काम करून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीकोनातून अधिक काम व्हावे ही आमची अपेक्षा आहे त्याबाबतही प्रयत्न केले जातील
या निवडीचे मल्टीस्टेट फेडरेशन व अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधीचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडू भाऊ काळे, बुलढाणा अर्बन संस्थेचे डॉ. सुकेश झंवर, दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, मियासाहेब पतसंस्थेचे शामराव निमसे, आदर्श पतसंस्थेचे अण्णासाहेब चोथे,व्यापारी पतसंस्थेचे प्रकाशशेठ पारस , डॉ. केमिस्ट संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, बाळासाहेब तांबे, विष्णुपंत गीते, किशोर थोरात, , अविनाश साबरे आबासाहेब वाळूंज आदिनी स्वागत केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत