सोनेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची परजणे कोल्हे युतीचे संजय गुडघे बिनविरोध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सोनेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची परजणे कोल्हे युतीचे संजय गुडघे बिनविरोध

सोनेवाडी (वेबटीम)  कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे परजणे युतीचे परजणे गटाचे संजय साहेबराव गुडघे यांची बिनविर...

सोनेवाडी (वेबटीम)



 कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे परजणे युतीचे परजणे गटाचे संजय साहेबराव गुडघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे परजणे गटाने एकत्र येत काळे गटाला धक्का देत कोल्हे गटाच्या सौ शकुंतला निरंजन गुडघे 524 मतांनी विजयी होत लोकनियुक्त सरपंच पदी विराजमान झाल्या.काल त्यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.

कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सोनेवाडी ग्रामपंचायतीवर कोल्हे परजणे गटाने पंधरा वर्षानंतर एकत्र येत काळे गटाच्या अनिता केशव जावळे यांचा 524 या विक्रमी मताने पराभव करत इतिहास रचला.

सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती.  विकासाचा अभाव या एकाच मुद्द्यावर कोल्हे परजणे गटाने सर्व मतदारसंघ पिंजून काढत सौ शकुंतला निरंजन गुडघे यांना निवडून आणले होते.लोकनियुक्त सरपंच शकुंतला निरंजन गुडघे यांच्यासह कोल्हे परजणे गटाचे नऊ उमेदवार निवडून येत सोनेवाडी ग्रामपंचायत पूर्ण बहुमत सिद्ध केले.काल उपसरपंचपदाची निवडणुक लोकनियुक्त सरपंच शकुंतला निरंजन गुडघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवडणूक प्रक्रियेचे कामकाज कोपरगाव भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक एस जे भास्कर यांनी पाहिले.त्यांना ग्रामसेवक विजय जोर्वेकर यांनी मदत केली.संजय गुडघे यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध विजयी उमेदवार घोषित करण्यात आले. मतदार प्रक्रियेत कोल्हे परजणे युतीसह काळे गटाच्या सदस्यांनीही भाग घेतला. निवडणूक प्रक्रियेच्या वेळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य परजणे कोल्हे युतीचे संजय साहेबराव गुडघे ,मंदा कर्णा कांदळकर, हिराबाई दौलत गुडघे, आबासाहेब भीवराव जावळे, मीना भाऊसाहेब खरात, जया धीरज लांडबले ,बाबासाहेब बाळासाहेब माळी, प्रकाश गंगाधर सरोदे ,जयश्री बाळासाहेब पासलकर तर काळे गटाचे  नानासाहेब कांतीलाल जावळे , सुरेखा लक्ष्मीकांत होन,शिंगाडे बाळासाहेब परसराम व गोदाबाई आनंदा रोकडे उपस्थित होते.

 लोकनियुक्त सरपंच शकुंतला गुडघे व उपसरपंच संजय साहेबराव गुडघे यांचा सोनेवाडी ग्रामपंचायत कार्यालय समोर नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी दौलतराव गुडघे, तुकाराम गुडघे ,शिवाजी जावळे, विश्वनाथ जावळे, विठ्ठल गुडघे, सोनेवाडी सोसायटीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब गुडघे, बाबासाहेब फटांगरे, साहेबराव घोंगडे ,व्यंकटराव राऊत, आनंदराव जावळे, चांगदेव फटांगरे, साहेबराव फटांगरे, पोलीस पाटील दगू गुडघे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सराजेंद्र गुडघे, सोनेवाडी सोसायटीचे अध्यक्ष संदीप गुडघे, संचालक निरंजन गुडघे, रघुनाथ मिंड,राधाजी सोदक, दत्तात्रेय गुडघे नंदकिशोर जायपत्रे, संजय गुडघे, माजी सरपंच विजय जगताप, संदीप जायपत्रे, संजयमोहन गुडघे, शांताराम जायपत्रे, जालिंदर बोंडखळ, गणेश राऊत, राहुल राऊत, माजी उपसरपंच किशोर जावळे,तुळशिदास जावळे, दीपक राऊत ,दिलीप गुडघे, चिलिया जावळे, गोरख गव्हाणे, विजय फटांगरे, धनंजय माळी, शशिकांत लांडगे, अशोक जावळे, धर्मा जावळे, मिठू बोंडखळ, सुभाष लांडबले, पोपट बर्डे ,सतीश सरोदे, अण्णासाहेब कांदळकर,नवनाथ गुडघे, संतोष गुडघे, भीमराज गुडघे, प्रमोद पासलकर ,जनार्दन खरात ,सुरेश साबळे, रखमा साळवे ,दीपक घोंगडे, नाना बत्तीशे, रमेश ढवळे, अण्णा गावडे, दिलीप फटांगरे ,चंद्रभान गुडघे, गणेश बोंडखळ, भाऊसाहेब खरात, सोमनाथ जावळे, सागर गुडघे, संजय गुडघे, भीमराव जायपत्रे अदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना सरपंच शकुंतला गुडघे व उपसरपंच संजय गुडघे यांनी सांगितले की सोनेवाडीच्या मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता गावात रखडलेले विकास कामे प्राधान्याने पूर्ण करू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार निरंजन गुडघे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत