श्रीरामपूर जिल्हा करून माऊलीनगर नांव देऊन अहिल्यादेवींना भारतरत्न देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर जिल्हा करून माऊलीनगर नांव देऊन अहिल्यादेवींना भारतरत्न देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  श्रीरामपूर (प्रतिनिधी)  राज्याचे गेल्या हिवाळी अधिवेशनानंतर नामांतरसह जिल्हा विभाजन सारखे ऐतिहासिक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले. याच पार्श्वभू...

 श्रीरामपूर (प्रतिनिधी)



 राज्याचे गेल्या हिवाळी अधिवेशनानंतर नामांतरसह जिल्हा विभाजन सारखे ऐतिहासिक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले. याच पार्श्वभूमीवर शासनाने वेळप्रसंगी नगर जिल्ह्याचे त्रिभाजन करून श्रीरामपूर जिल्हा जाहिर करावा. तसेच जिल्ह्याला संत ज्ञानेश्वर महाराजांचे नावाने माऊलीनगर नामांतर करावे. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा. यासाठी 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत जिल्हाभर ग्राम सभेत ठराव व्हावेत या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना श्रीरामपूर जिल्हा कृती समिती उपाध्यक्ष आणि पसायदान बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी दिले आहे.

 प्रसिद्धी पत्रकात राजेंद्र लांडगे म्हणाले कि,जवळपास ४२-४३ वर्षाचा जिल्हा विभाजन तिढा संपुष्टात येणं सर्वांचे हितावह राहिल. शासनाने वेळ प्रसंगी जिल्ह्याचे त्रिभाजन करावे. प्रायोगिक तत्वावर कमी खर्च येणारा श्रीरामपूर जिल्हा जाहिर करावा.तसेच जिल्ह्यातच नेवासा येथे संत ज्ञानेश्वर माऊलींने ज्ञानेश्वरी लिहिली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला माऊलीनगर असं नामांतर व्हावं. आणि जिल्ह्यातच चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला आहे. त्यांचे अलौकिक कार्य देशभर सर्वश्रुत असलेनं त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. या तीन सामाजिक आणि ऐतिहासिक प्रश्नावर निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देते वेळी सविस्तराने विचारविनिमय झाला. 

  याप्रसंगी तुमचे निवेदन उचित कार्यवाहीस्तव शासनाकडे पाठविले जाईल असे निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील राजेंद्र लांडगे यांना म्हणाले आहेत. 

  तसेच जिल्ह्याची भौगोलिकस्थिती, जनगणना,सध्याची वाढती लोकसंख्या, रोजगार निर्मिती, क्रयशक्ती वाढ,आपत्कालीन संकटे, केंद्र- राज्य कल्याणकारी योजना, ऐतिहासिक अध्यात्मिक स्थळे आदि विषयावर सकारात्मक चर्चा झाली. लोकसंख्या जवळपास 50 लाखापर्यंत पोहोचली याकडे निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.

  राज्याला धाडसी आणि कर्तुत्वनिष्ठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाभले आहे. योगायोगाने पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटलांचे रूपाने जिल्ह्याला तिसऱ्यांदा महसूल खाते मिळाले आहे. हि सर्वांचे दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. 

  लवकरच शिंदे-फडणवीस सरकारने जवळपास 42-43 वर्षाचा जिल्हा विभाजन प्रश्न एकदाचा मार्गी लावावा, शासन निकष आधारे प्रायोगिक तत्वावर श्रीरामपूर जिल्हा करावा.  जिल्ह्याचे संत ज्ञानेश्वर माऊलीनगर असं नामांतर व्हावे. त्याच बरोबर पुण्यश्लोक आहिल्यादेवींना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी प्रत्येक ग्राम सभेत ठराव करणेचे आवाहन राजेंद्र लांडगे यांनी यनिमित्ताने सामाजिक भावनेतून केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत