देवळाली प्रवरा प्रिमियर लीग-२०२३ (DPPL-2023) साठी उद्या खेळाडूंची निवड चाचणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा प्रिमियर लीग-२०२३ (DPPL-2023) साठी उद्या खेळाडूंची निवड चाचणी

देवळाली प्रवरा(वेबटीम) शिर्डी संस्थांनचे माजी उपाध्यक्ष व माजी आ. चंद्रशेखर कदम पा.  यांच्या  अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने भव्य टेनिस बॉल क...

देवळाली प्रवरा(वेबटीम)


शिर्डी संस्थांनचे माजी उपाध्यक्ष व माजी आ. चंद्रशेखर कदम पा.  यांच्या  अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थांत देवळाली प्रवरा प्रिमियर लिग  ३०जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२३ होणार आहे, या स्पर्धेत फक्त देवळाली प्रवरा शहरातील खेळाडूंना वाव व संधी मिळावी म्हणून या स्पर्धेत फक्त शहरातील खेळाडूंना भाग घेता येणार आहे. 


अधिकृत आधार कार्ड हा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे, या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या नोंदणी साठी ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म १ जानेवारी ते ५ जानेवारी या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यास भरपूर प्रतिसाद मिळाला असून शहरातील १६७ खेळाडूंनी आपली नोंदणी केली आहे.


 उद्या रविवार दि. ८ जानेवारी 2023 रोजी सकाळी १० ते सायं ५ वाजे दरम्यान राहुरी फॅक्टरी (श्रीशिवाजीनगर) येथील इंजिनिअरिंग कॉलेज ग्राउंडवर खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे.


 क्रिकेटच्या खेळाच्या प्रत्येक फलंदाजी, गोलंदाजी व अष्टपैलू प्रकारची निवड चाचणीसाठी निकष लावून त्याला गुणांकन देऊन खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने खेळाडूचा खेळ, अनुभव, वय, तंदुरुस्ती, स्पर्धेतील  उपलब्धता याशिवाय इतर तांत्रिक गोष्टी या निकषात असतील त्यास गुणांकन देऊन खेळाडूंची पारदर्शकरित्या निवड करण्यात येणार आहे व जास्तीत खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे तरी सर्व नोंदणी केलेल्या खेळाडूंनी सकाळी १० वाजता मैदानावर हजर रहावे व येताना आपले आधार कार्ड घेऊन यावे असे आवाहन देवळाली प्रवरा प्रिमियर लीगच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 



*स्पर्धेचे वैशिष्ट्ये*

*देवळाली प्रवरा क्रिकेट प्रेमींना पर्वणी असणारी एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा ...*

देवळाली प्रवरा प्रीमियर लीग

अर्थात DPPL-2023

30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान...

🏏 *एकूण 8 संघ व संघमालक*

🏏 *लीग पद्धतीने सामने व गुणांकन*

🏏  *यु ट्यूब वर थेट लाईव्ह प्रक्षेपण*

🏏 *दर्जेदार पंच आणि समालोचक*

🏏 *फक्त देवळाली प्रवरा शहरातील गुणवान खेळाडूंना संधी*

🏏 *आकर्षक बक्षिसे*

🏏 *सुसज्ज मैदान, साऊंड सिस्टीम व मंडप व्यवस्था*

🏏 *6 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत