सात्रळ(वेबटीम) महसूल आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि लोकनेते पद्मभूष...
सात्रळ(वेबटीम)
महसूल आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ (ता. राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 'नवीन शैक्षणिक धोरण 2020: उद्योग व शैक्षणिक संस्था एक अनुबंध' या विषयावर दि. १० व ११ फेब्रुवारी रोजी सात्रळ महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधील निष्कर्षांचा उपयोग नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी निश्चितच होईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर माणिकराव डोंगरे यांनी दिली.
सदर कार्यशाळेत अमिटी युनिव्हर्सिटी मुंबई येथील डॉ. दत्तात्रय लाटे, मुंबई येथील प्रादेशिक पेटंट आणि डिझाईन ऑफिसचे सहाय्यक नियंत्रक डॉ. सुहास कुलकर्णी, पुणे येथील एनसीएल इनोव्हेशन पार्कचे श्री. माणिक वाघमारे, पुणे येथील सोशल इनोव्हेशन सेंटरच्या विभागप्रमुख डॉ. मुग्धा लेले, कुरकुंभ-दौंड येथील लव्हेंडर प्रयोगशाळेचे मुख्य संचालक डॉ. अतुल डोखे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. ज्ञानदेव पठारे, डायमंड केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नेताजी पलांडे, संस्थेचे अतिरिक्त सचिव डॉ. शिवानंद हिरेमठ आदीसह अभ्यासक, शिक्षण तज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षण क्षेत्रात कोणकोणते नवीन प्रयोग केले जाणार आहेत ? कोणकोणते नवीन बदल होणार आहेत ? जाणून घेण्यासाठी अभ्यासक, संशोधक तसेच सात्रळ पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी बंधू-भगिनींनी कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यशाळेचे मुख्य सचिव डॉ. अमित वाघमारे, समन्वयक डॉ. शिवाजी पंडित यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत