राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील सोनगाव केंद्रातील अतिशय टोकाला असणाऱ्या जि.प.प्राथमिक शाळा तुळापूर चे विद्यार्थी जिल्ह्यास्तरीय स्पर्धेत ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील सोनगाव केंद्रातील अतिशय टोकाला असणाऱ्या जि.प.प्राथमिक शाळा तुळापूर चे विद्यार्थी जिल्ह्यास्तरीय स्पर्धेत चमकले आहेत.
अहमदनगर जिल्हा परिषद आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या विविध गुणदर्शन स्पर्धा अंतर्गत 'सुंदर हस्ताक्षर स्पर्धा' या प्रकारातील बालगट व किलबिल गट या दोन्ही गटांमध्ये तुळापूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
किलबिल गट (इयत्ता पहिली दुसरी) या गटामध्ये समृद्धी अमोल हारदे या विद्यार्थिनीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर विराज विवेकानंद खामकर याने बालगटात ( इयत्ता तिसरी चौथी) या गटामधून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षराचे फोटोज व व्हिडिओज विविध समाज माध्यमातून शेअर होत आहेत. राज्यभरातून विविध विद्यार्थी व शिक्षकांकडून ते आवडीने पाहिले जात आहेत. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांना या सुंदर हस्ताक्षरासाठी वर्गशिक्षक विवेकानंद खामकर त्याचबरोबर मुख्याध्यापक जगन्नाथ भांगरे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
तुळापूर ग्रामस्थांच्या वतीने या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. तुळापूर गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब हारदे , उपसरपंच गणेश हारदे, गावचे पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश हारदे, सदस्य बापूसाहेब हारदे ,राहुरी तालुक्याचे माजी सभापती भीमराज हारदे , गटशिक्षणाधिकारी नजन,शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गारूडकर, केंद्रप्रमुख ठोंबरे यासह सर्व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवणारी प्रणाली प्रणाली प्रभाकर हारदे हिचा ही सन्मान करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत