राहुरी स्टेशन चौकास छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी स्टेशन चौकास छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण

  राहुरी (प्रतिनिधी)  राहुरी रेल्वे स्टेशन येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व स्टेशन चौकास 'छत्रपती शिवाजी महाराज चौक' नामकरण सो...

 राहुरी (प्रतिनिधी)



 राहुरी रेल्वे स्टेशन येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व स्टेशन चौकास 'छत्रपती शिवाजी महाराज चौक' नामकरण सोहळा उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांदुळवाडी ग्रामपंचायतचे सदस्य सय्यद निसारभाई हे होते. तर सेवानिवृत्त सैनिक श्री जगन्नाथ पाटील पेरणे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून चौक नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. तांदुळवाडी ग्रामपंचायत, रिस्क ग्रुप व निळं वादळ यांच्या वतीने शिवजयंती सोहळा व चौकाचे नामकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राहुरी नगरपालिका शाळा नंबर ५, प्रसाद विद्यालय व तांदुळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व गुणदर्शन कार्यक्रम साजरे केले. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित जोशपूर्ण भाषणे करून वातावरणात चैतन्य निर्माण केले होते.


 उपस्थित ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांवर बक्षीसांचा वर्षाव करून मुलांना शाब्बासकी दिली तर नंतर विद्यार्थ्यांना गोड जेवण  देण्यात आले. कार्यक्रमास तांदुळवाडी  ग्रामपंचायत सरपंच सौ. गायत्री अमोल पेरणे, बाळासाहेब पाटील पेरणे, अमोलभाऊ पेरणे, ग्रामपंचायत सदस्य विराज धसाळ, उपसरपंच ज्ञानेश्वर खिलारी, भैय्यासाहेब आढाव, विक्रम पेरणे, उमेश पेरणे, डॉक्टर राजेश पेरणे, बाळासाहेब आघाव, आयुबखान पठाण, सूर्यभान पाटील म्हसे, सचिन पेरणे, ओंकार म्हसे, अमीन पठाण, प्रभाकर म्हसे, पंडित पेरणे, सागर वाघ लक्ष्मण खिलारी, रमेश कदम, राजू शिंदे, राम जाधव, कुंदन खेत्रे, पप्पू त्रिभुवन, विशाल निकम ,सतीश गायकवाड, सतीश चितळकर, संदीप गायकवाड, प्रसाद पेरणे, नंदू पेरणे, भाऊसाहेब पेरणे तसेच प्रसाद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता गायकवाड, पाच नंबर शाळेचे मुख्याध्यापक सचिन धोत्रे, जिल्हा परिषद शाळेचे बाचकर सर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोलभाऊ पेरणे व ज्ञानेश्वर खिलारी यांच्या रिस्क ग्रुप व निळं वादळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आघाव सर व नियोजन विजय साळवे सर यांनी करून आभार बाळासाहेब पाटील पेरणे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत