आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील आंबी, अंमळनेर, दवणगांव, केसापूर या प्रवरा नदी काठावरील गावांना जोडणारा रस्ता मोठमोठे खड्डे पडून अत्यंत खराब ...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील आंबी, अंमळनेर, दवणगांव, केसापूर या प्रवरा नदी काठावरील गावांना जोडणारा रस्ता मोठमोठे खड्डे पडून अत्यंत खराब झाला असून रस्त्याकडेच्या कपारी उघड्या पडल्याने जीव मुठीत घालून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेला वाचा फोडणारी बातमी दि. ०४ फेब्रुवारी रोजी 'आवाज जनतेचा' वेब पोर्टलवर प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून रस्त्याच्या प्रत्यक्ष डागडुजीला बेलापूर खुर्द पासून सुरुवात झाली आहे.
केशव गोविंद भगवानाचे स्तंभरुपी जागृत देवस्थान, शाळा, महविद्यालय, नावलौकिक प्राप्त साई-प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनी या रस्यावर येत असल्याने भाविक, शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण, दिव्यांग, शेतकरी, दुग्धव्यवसायिक यांची कायम वर्दळ असते. त्यामुळे छोटे मोठे अपघात नित्याचे झाले होते. श्रीरामपूर मतदारसंघाचे ‘रोडकरी’ आमदार लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सोनगाव ते चांदेगाव या रस्त्यासाठी पाच कोटी रूपये मंजूर झाले आहे. त्यातून आंबी पर्यंत रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र बदललेल्या सरकारने 'स्थगिती' दिल्यामुळे आंबी ते चांदेगाव हा दुसऱ्या टप्प्यातील रस्ता अर्धवट राहिला आहे. या अर्धवट रस्त्याचे काम सुरू करणेकामी आंदोलनाचा इशारा अंमळनेर सोसायटीचे माजी चेअरमन उध्दवराव कोळसे, केसापूरचे माजी सरपंच विनायक टाकसाळ, नारायण डुकरे यांचेसह आदि ग्रामस्थ व प्रवाशांनी दिला होता.
"आंबी-बेलापूर खुर्द रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले असले तरी हे काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ठ प्रतीचे चालू आहे. फक्त ठराविक ठिकानाचेच खड्डे बुजवले जात आहे. रस्त्यावर होणाची अवजड वाहतून पाहता हे बुजवलेले खड्डे तग धरणार नाही. त्यामुळे प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत