राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर सोमेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर सोमेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान भव्य संगितमय श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प नवनाथ महाराज म्हस्के यांच्या सुश्राव्य वाणीतून १२ ते १९ फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत श्री शिव महापुराण कथा श्रवणाचा भाविकांना लाभ मिळणार आहे. दररोज कथा संपल्यानंतर भविकांच्या प्रसादाची व्यवस्था करण्यात येणार असून यासाठी समाजातील दानशूर मंडळींचे सहकार्य लाभणार आहे.
रविवार १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत ह.भ.प भगवान महाराज डमाळे यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसाद पंगतीने सांगता होणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोमेश्वर प्रतिष्ठान व परिसरातील नागरिकांनी केले आहे.
१६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान शिवलीला अमृत पारायण सोहळा
गुरुवार दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिवलीला अमृत पारायण सोहळा संपन्न होणार असून पारायणासाठी इच्छुक असलेल्या भाविकांना ग्रँथ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत