राहुरी(वेबटीम) ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धेच्या युगात मागे न राहता स्पर्धा परिक्षांना सामोरे जावून यश संपादन करा असे आवाहन कणगर गावचे सुप...
राहुरी(वेबटीम)
ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धेच्या युगात मागे न राहता स्पर्धा परिक्षांना सामोरे जावून यश संपादन करा असे आवाहन कणगर गावचे सुपुत्र तथा सातारा जिल्ह्यातील पाटण येथील प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी केले.
कणगरचे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सर्जेराव घाडगे व प्रांताधिकारी सुनील गाढे यांच्या संकल्पनेतून कणगर व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी लागणारी विवीध प्रकारची १०० पुस्तके कणगर ग्रामपंचायतच्या निधीतून सार्वजनिक वाचनालयाकडे सुपूर्त करण्यात आले. प्रसंगी प्रांताधिकारी गाढे बोलत होते.
यावेळी बोलताना सुनील गाढे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रातील आव्हान पेलून स्पर्धा परीक्षाबरोबरच महसूल, पोस्ट ऑफिस, पोलिस भरती, लिपिक भरती यासाठीही प्रयत्न करावेत . ग्रामपंचायतीने पुस्तक देऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल कौतुक केले.
यावेळी खाटेकर सर, साठे मॅडम, भीमराज गाढे, उद्योजक रवी वरघुडे, गोविंदराव दिवे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सुधीर गाढे, शाम गागरे, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गाढे, मच्छिंद्र वरघुडे, बाबासाहेब गाढे, भाऊ घाडगे, शिवाजी घाडगे, डॉ.रघुनाथ नालकर, राजू दिवे, प्रकाश नालकर, आण्णासाहेब शेटे, सुभाष नालकर, बाळासाहेब गाढे, भगवान घाडगे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य संदीप घाडगे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत