तहसील कार्यालयात नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' सुरू करा – स्नेहल सांगळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तहसील कार्यालयात नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' सुरू करा – स्नेहल सांगळे

राहुरी(वेबटीम) सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने आदींवर कार्यवाही करण...

राहुरी(वेबटीम)



सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने आदींवर कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' सुरु करावेत अशी मागणी रमाई बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडीच्या राहुरी तालुकाध्यक्ष स्नेहल सुरेंद्र सांगळे यांनी केली आहे.

      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात सांगळे यांनी म्हंटले आहे की, जिल्ह्यातील नागरिकांनी प्रलंबित प्रश्न कामे तातडीने सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्षात त्यांचे लेखी अर्ज, निवेदन सादर करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत जिल्हा स्तरावर करण्यात आले आहे. मात्र गाव-खेड्यांतील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करणे शक्य नाही. त्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक, शारीरिक तान व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. सामान्य नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रत्येक तहसील कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' स्थापन करून या कक्षामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून तहसीलदार अथवा नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच नेमणूक केलेल्या विशेष कार्य अधिकारी यांचेमार्फत नागरिकांचे प्रलंबित प्रश्न, कामे तातडीने सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्षात त्यांचे लेखी अर्ज, निवेदन यांचा स्वीकार करून स्वतंत्र यंत्रणेमार्फत त्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सांगळे यांनी केली आहे. प्रशासनाच्या वतीने अव्वल कारकून फिरोज सय्यद यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देण्यासाठी अध्यक्ष स्नेहल सांगळे, सचिव सुरेंद्र सांगळे, प्रियंका सगळगिळे, सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव आदी उपस्थित होते.


“शासनाने जिल्हा स्तरावर स्थापन सर्वसामान्य नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' सुरु करण्याच्या निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र गाव-खेड्यांतील सामान्य नागरिकाला जिल्हाधिकारी कार्यालयात ये-जा करणे शक्य नाही. त्यामुळे मा. मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनामध्ये गतिमानता येण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' सुरु करावेत अशी मागणी केली आहे.”

- स्नेहल सांगळे (तालुकाध्यक्ष, रिपाई महिला आघाडी)


श्रीरामपूर : तहसील कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करावे या आशयाचे उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांचेमार्फत   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना स्नेहल सांगळे आदी.(छाया : संदिप पाळंदे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत