वैष्णवी चौक राहुरी फॅक्टरी येथील वैष्णव देवी भक्तांनी केली जम्मू (कटारा) येथे शिवजयंती साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वैष्णवी चौक राहुरी फॅक्टरी येथील वैष्णव देवी भक्तांनी केली जम्मू (कटारा) येथे शिवजयंती साजरी

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम) वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान आयोजित  वैष्णवी माता दर्शन यात्रेतील शेकडो वैष्णव भक्त दि 11 फेब्रुवारी रोजी वैष्णवी देव...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान आयोजित  वैष्णवी माता दर्शन यात्रेतील शेकडो वैष्णव भक्त दि 11 फेब्रुवारी रोजी वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जम्मू(कटारा) या ठिकाणी गेलेले आहे



   या यात्रेत अमृतसर येथील सुवर्णमंदिर,वाघा बॉर्डर,वैष्णवी देवी दर्शन,शिवखोरी,पटनी टॉप या ठिकाणाहून प्रवास करत आज शिवजयंती च्या दिवशी हे भाविक परतीच्या प्रवासाला निघणार होते. परंतु महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आपल्याला महाराष्ट्रात साजरा करता येणार नाही याची हुरहूर यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांच्या मनाला लागलेली होती.


   आज 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्ताने यात्रा कमिटीने दृढ निश्चय केला की, आपल्याला आपल्या दैवताची जयंती ही जम्मू(कटारा)या ठिकाणीच साजरी करायची.

 या अनुषंगाने शिवजयंतीची सर्व तयारी करून जम्मू(कटारा)येथे सर्व भाविकांनी महाराजांचा जयजयकार करत मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.


   यावेळी वसंत कदम,मयूर मोरे, जालिंदर दोंड,राहुल नांगरे, सुनील कराळे,बाबासाहेब खांदे,अमोल वाळुंज,मच्छिंद्र कवाने,सुभाष लोंढे,संदीप जाधव,लक्ष्मण तोडमल,दादासाहेब वाणी,अविनाश कणसे,संजय धुमाळ,पाटीलबा तनपुरे, सुजित क्षीरसागर, दत्तात्रय भडके,सोपान हरीचंद्र, बाबासाहेब नरोडे  तसेच  महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत