कर्मवीर अकॅडमी येथे श्री.साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कर्मवीर अकॅडमी येथे श्री.साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना सोहळा

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गावरील कर्मवीर अकॅडमी येथे  श्री.साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना सोहळा...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गावरील कर्मवीर अकॅडमी येथे  श्री.साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना सोहळा व कीर्तन महोत्सव दिनांक २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कर्मवीर अकॅडमीचे संस्थापक मेजर राजेंद्र कडू यांनी दिली.


 पोलीस, आर्मी व इतर भरती संदर्भात प्रशिक्षण देणाऱ्या कर्मवीर अकॅडमी येथे भव्य दिव्य साई मंदिर उभारण्यात आले असून मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहन निमित्त कीर्तन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


 उद्या मंगळवार २१ रोजी सायंकाळी ६ वाजता कर्मवीर अकॅडमी येथून भव्य मिरवणूक निघणार आहे. तसेच बुधवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी रात्री ७ ते ९ या वेळेत भागवताचार्य बबन महाराज बहिरवाल(आष्टी) यांचे कीर्तन व महाप्रसाद, गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी रात्री ७ ते ९ शिवचरित्रकार ज्ञानेश्वर महाराज जळकीकर(जळगाव) यांचे कीर्तन व महाप्रसाद संपन्न होणार आहे.


  या सोहळ्याची सांगता शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासा)यांच्या काल्याचे किर्तन व भव्य महाप्रसादाने केली जाणार आहे.

 या कार्यक्रमास राजकिय, सामाजिक, धार्मिक, उद्योग क्षेत्रातील मंडळी तसेच पोलीस -महसूल व इतर खात्यातील अधिकारी उपस्थित राहणार आहे.


 तरी या कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कर्मवीर अकॅडमीचे संस्थापक मेजर राजेंद्र कडू व सर्व प्रशिक्षक , कर्मचारी व विद्यार्थी वृंद तसेच कडू परिवाराने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत