देवळाली प्रवरातील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी बोर्ड परीक्षेस प्रारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी बोर्ड परीक्षेस प्रारंभ

देळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १२ वीच्या परीक्षा केंद्रावर विद्...

देळाली प्रवरा/वेबटीम:-

देवळाली प्रवरा येथील श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १२ वीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणाऱ्या १२ वी बोर्ड परीक्षेस प्रारंभ झाला आहे. 

सकाळी १० वाजल्यापासून विद्यार्थ्यांसह पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. विद्यार्थी आपला ब्लॉक व परीक्षा क्रमांक शोधण्यासाठी धावपळ करताना दिसून आले.

आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये काहीसे तणाव व भितीचे वातावरण पाहावयास मिळाले.

दरम्यान यावेळी केंद्र प्रमुख शिंदे मॅडम, मुख्याध्यापक बाबासाहेब चव्हाण,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नितीन वाळुंज, सेक्रेटरी अनंत कदम, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष सुनील भांड,पत्रकार श्रीकांत जाधव यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर प्रा.गणेश भांड यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

देवळाली प्रवराच्या या १२ वीच्या परीक्षा केंद्रावर राहुरी फॅक्टरी येथील श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल, राहुरी फॅक्टरी येथील गायत्री शिक्षण संस्था, लक्ष्मीनारायण आयटीआय व देवळाली प्रवरातील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी १२ वीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहे.

परीक्षा केंद्रावर कॉपी व अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली,महसुल, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या मार्फत भरारी पथक तैनात करण्यात आले आहे.परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा आऊट पोस्टच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त तैनात ठेवला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत