सचिन लाटे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सचिन लाटे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) टाकळीभान येथे पार पडलेल्या  पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील ...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



टाकळीभान येथे पार पडलेल्या  पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील  सामाजिक कार्यकर्ते  शिवसेना तालुका उपप्रमुख सचिन लाटे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस अध्यक्षस्थानी होते. तर  ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक आ.लहुजी कानडे, संत ज्ञानेश्वर संस्थान नेवासा येथील ह.भ.प शिवाजी महाराज देशमुख, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ.वंदना मुरकुटे, चित्रपट, गीतकार,कवी बाबासाहेब सौदागर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये आदी  उपस्थितीत  होते.


 प्रसंगी गेल्या 17 ते 18 वर्षापासून समाजसेवेत कार्यरत असलेले चिंचोली येथील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना तालुका उपप्रमुख श्री सचिन लाटे यांना समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी स्कूल कमिटी अध्यक्ष गणेश लाटे, रामपूरचे माजी सरपंच अरुण भोसले, बापूसाहेब नलगे, श्याम नाननोर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत