आंबी (वेबटीम) अहमदनगर जिल्ह्यात कृषी क्षेत्रात नावलौकिक प्राप्त राहुरी तालुक्यातील केसापूर येथील साई-प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या नूतन...
आंबी (वेबटीम)
अहमदनगर जिल्ह्यात कृषी क्षेत्रात नावलौकिक प्राप्त राहुरी तालुक्यातील केसापूर येथील साई-प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या नूतन संचालकपदी आंबी-अंमळनेर येथील श्रीमती मंगल रायभान जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी कंपनीचे दिवंगत संचालक कृषिभूषण रायभान चाचा जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
श्रीमती जाधव या साई-प्रवराचे दिवंगत संचालक कृषिभूषण स्व. रायभान चाचा जाधव यांच्या पत्नी आहेत. स्व. रायभान चाचा जाधव यांचे दि. २७ डिसेंबर २०२२ रोजी हृदय विकाराने अकाली निधन झाले होते. जाधव यांची घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी साई-प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनीने घेतली आहे. कंपनीच्या ८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचालक मंडळाच्या सभेत श्रीमती मंगल जाधव यांची बिनविरोध निवड पार पडली.
जाधव यांच्या निवडीची सूचना जेष्ठ संचालक कुंडलिक खपके यांनी मांडली तर त्यास अनुमोदन अध्यक्ष संभाजी नान्नोर यांनी दिले. प्रास्तविक कंपनीचे सचिव दादासाहेब मेहेत्रे यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक सुनिल साबळे यांनी मांडले. यावेळी उपाध्यक्ष नंदकिशोर मुसमाडे संगिता राजेंद्र वडितके, केसापूरच्या जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य सुशिला दादासाहेब मेहेत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष मेहेत्रे, लेखाधिकारी अमृत शिरसाठ, पत्रकार संदिप पाळंदे यांसह आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत