देवळाली प्रवरात सत्यजित कदम फौंडेशनच्यावतीने महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात सत्यजित कदम फौंडेशनच्यावतीने महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

  देवळाली प्रवरा(वेबटीम) जागतिक महिला दिनानिमित्त  ८ मार्च २०२३ देवळाली प्रवरा येथील सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने यंदाही विविध सांस्कृतिक क...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)


जागतिक महिला दिनानिमित्त  ८ मार्च २०२३ देवळाली प्रवरा येथील सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने यंदाही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती सौ.प्रीतीताई सत्यजीत कदम यांनी दिली.



याबाबत माहिती देताना सौ.कदम म्हणाल्या की, ८ मार्च रोजी दुपारी  २.३० वाजता महिला व तरुणींची भव्य मोटारसायकल रॅली निघणार असून त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता महिलांच्या कलागुणांना व्हावं देण्यासाठी 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


 यावेळी यंदाच्या महिला दिनापासून सत्यजित कदम फाउंडेशनच्यावतीने 'उत्कृष्ट सासु-सून' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  

उत्कृष्ट सासू -सून पुरस्कारासाठी दि. ०१ मार्च २०२३ पर्यंत  गुगल फॉर्मवर अथवा ९३५९००६६०० ,९६६५५४७००४  नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.


'उत्कृष्ट सासु-सून' पुरस्कार  नियम व अटी

१. सासू व सून ह्या गेल्या पाच वर्ष एकाच घरात राहिलेल्या हव्यात. 

२. सासू व सून ह्या दोघी पुरस्काराच्या दिवशी कार्यक्रमास उपस्थित हव्यात. 

३. सासू व सून ह्या दोघी देवळाली प्रवरा या गावातच राहावयास असाव्यात. 

४. एक सासू व एकापेक्षा जास्त सुना यामध्ये सहभागी होवू शकतात.

५. ज्यांना हा गुगल फॉर्म भरता येणार नाही त्यांनी वरील संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपली नावनोंदणी करावी. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत