राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळांची निवडणूक बिनविरोध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळांची निवडणूक बिनविरोध

  देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालूक्यात अग्रगण्य असलेल्या राहुरी फँक्टरी येथिल आदर्श नागरी सहकारी पत संस्थेची संचालक मंडळाची सन २०२३  ते २...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालूक्यात अग्रगण्य असलेल्या राहुरी फँक्टरी येथिल आदर्श नागरी सहकारी पत संस्थेची संचालक मंडळाची सन २०२३  ते २०२७-२८ ची पंचवार्षिक निवडणूक माजी खासदार प्रसाद तनपूरे, आमदार प्राजक्त तनपूरे,प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश आण्णा वाबळे, व विद्यमान अध्यक्ष आण्णासाहेब चोथे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करण्यात आली आहे. संस्थेच्या २७ वर्षाच्या इतिहासात एक पंचवार्षिकचा अपवाद वगळता संस्थेची निवडणूक कायम बिनविरोध झाली आहे. या मध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आण्णासाहेब चोथे यांचा सिंहाचा वाटा आहे.

  या बाबत माहिती देतांना संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब चोथे म्हणाले, संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होती. परंतू  संस्थेवर निवडणूक खर्चाचा बोजा पडू नये म्हणून तसेच संस्थेची बिनविरोध निवडणूकीची परपंरा अखंडीतपणे सुरु रहावी म्हणून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी  संस्थेचे मार्गदर्शक व संस्थेचे   अध्यक्ष, उपाध्यक्ष,संचालक व सभासद यांच्या सर्वांच्या सहकार्याने व वरील नेतृत्वाने विशेष सहकार्य केल्याने ही निवडणूक बिनविरोध पारपडली आहे.सर्व साधारण मतदार संघा मधून नूतन संचालक म्हणून आण्णासाहेब चोथे,शिवाजीराव कपाळे,सुधाकर कदम,आबासाहेब वाळुंज, भारत चोथे,अविनाश साबरे, अनू.जाती मतदार संघा मधून मारुती खरात, महिला राखीव मतदार संघा मधून पल्लवी सोनी,कमला काळे इतर मागासवर्गीय मतदार संघा मधून विष्णूपंत गिते,भ.ज.वि.ज मतदार संघा मधून दत्तात्रय रोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शी असून संस्थेकडे ७० कोटीच्या ठेवी असून १०० कोटीच्या ठेवी कडे संस्थेची वाटचाल सुरु आहे.हे ठेवीदारांचा संचालकावर असलेल्या विश्वासाचे द्वोतक असल्याचे शेवटी अध्यक्ष आण्णासाहेब चोथे यांनी सांगितले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शांतीचौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभूवन,हार्षद ताथेड,प्रकाश सोनी,नितिन डमाळे,भारत काळे आदीचे सहकार्य लाभले.

          -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत