राहुरी(वेबटीम) दि.02/02/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना वांबोरी ते नगर जाणारे रोडवर गुंजाळे गावचे परिसरात एका शेतात सेक्स रॅकेट चालवून बळज...
राहुरी(वेबटीम)
दि.02/02/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना वांबोरी ते नगर जाणारे रोडवर गुंजाळे गावचे परिसरात एका शेतात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली. त्यावरून सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन तिन पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.
त्यानुसार पो.कॉ रमेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून आरोपी रवि उर्फ संजय राजू गायकवाड रा. गुंजाळे ता. राहुरी याचे विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन गु.र.न.122 /2023 महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारस प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वांबोरी परिसरातील व शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके , पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, पोलीस उपनिरीक्षक माणिक चौधरी, स.फौ.अकोलकर, पो.हे कॉ.चंद्रकांत ब-हाटे, पो.ना,पारधी,म.पो.ना कोहकडे, पो.कॉ ताजणे, शिंदे,साखरे,नदीम शेख,ठोंबरे, आदींनी केली केली.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत