राहुरी फॅक्टरीचे व्यापारी जयेश देसरडा यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेला ट्रकचालक राहुरी पोलिसांनी पकडला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीचे व्यापारी जयेश देसरडा यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेला ट्रकचालक राहुरी पोलिसांनी पकडला

    राहुरी(वेबटीम)  राहुरी फॅक्टरी येथील ४२ वर्षीय व्यापारी जयेश देसर्डा यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या राजस्थान राज्यातील  मालवाह...

  राहुरी(वेबटीम)



 राहुरी फॅक्टरी येथील ४२ वर्षीय व्यापारी जयेश देसर्डा यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या राजस्थान राज्यातील  मालवाहतूक ट्रक चालकास  जालना जिल्ह्यातील हासनाबाद पोलिस स्टेशन हद्दीतून  ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा व कर्मचाऱ्यांनी कामगिरी केली आहे.



व्यापारी जयेश देसरडा यांना नगर-मनमाड मार्गावर परराज्यातील ट्रक चालकाने कट मारला होता. यावेळी देसरडा हे ट्रकच्या चालकाला ड्रायव्हर साईटला जाऊन खाली उतरवत होते.परंतु मालवाहतूक ड्रायव्हर खाली न उतरता त्याने ट्रक चालू केला. त्यामुळे देसरडा हे ड्रायव्हर साइडच्या पायरीवर पाय ठेऊन ड्रायव्हर साईडच्या खिडकीला लटकले गेले. सदर मालवाहतूक ट्रक जोगेश्वरी आखाडा काका ढाबा परिसरातील पोहचत असतानाच रस्त्यावर एकेरी वाहतूक चालू असल्याने समोरून कापूस घेऊन चाललेले वाहन  आणि सदरचे मालवाहतूक गाडी जवळजवळ घासून गेल्याने यामध्ये देसर्डा दबल्या गेले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


दरम्यान त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.त्यानंतर मालवाहतूक ट्रक क्रमांक व मोबाईल नंबर सिडिआरवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.




 पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांचे पथक आरोपीच्या शोधार्थ रवाना झाले असता आज जालना जिल्ह्यातील हासनाबाद पोलिस स्टेशन हद्दीतून  सदर मालवाहतूक ट्रक चालक  मोहनलाल उदयराम वय २९ वर्ष रा. बाली, झालावाड राजस्थान यास ट्रकसह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा यांच्यासह प्रविण खंडागळे, पोशि रवि कांबळे, पोशि रोहित पा आदिनाथ चेमटे,  पो.ना फुरकान शेख यांनी ही कामगिरी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत