देवळाली प्रवरातील भजनी मंडळाला पंढरपूरात विठ्ठलाच्या गाभाऱ्यात भजन सेवा करण्याची मिळाली संधी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील भजनी मंडळाला पंढरपूरात विठ्ठलाच्या गाभाऱ्यात भजन सेवा करण्याची मिळाली संधी

  देवळाली प्रवरा(वेबटीम) पंढरीचा, पांडुरंग विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक नेहमीच आतुरलेले असतात परंतू देवळाली प्रवरातील भजनी मंडळ हे पंढरपूर ...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



पंढरीचा, पांडुरंग विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक नेहमीच आतुरलेले असतात परंतू देवळाली प्रवरातील भजनी मंडळ हे पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात भजन सेवा करण्यासाठी उत्सुक होते.अखेर देवळाली प्रवरातील या भजनी मंडळाला अभंग, गौळणी गायन करून विठ्ठलाच्या दरबारात सेवा करण्याची संधी भेटली आहे. राहुरी तालुक्यातील हे पहिले भजनी मंडळ आहे की, ज्यांनी विठ्ठललाच्या गाभाऱ्यात आपली सेवा अर्पण केली.

 पंढरपुरात चंद्रभागेचे स्नान करून मंदिरात सकाळी पांडुरंगाच्या मंदिरात भजन सेवा केली.



यावेळी भजनी मंडळात राजू चव्हाण ,बाळासाहेब मुसमाडे, किशोर निर्मळ, बाबुराव मामा गवळी,रावसाहेब भांड, कारभारी चव्हाण, बाळासाहेब भुमकर, अशोक हूडे, रमेश टिक्कल, रामभाऊ अटक मृदंगाचार्य बाबासाहेब सरोदे, गौरव हूडे, अक्षय परदेशी यांनी सकाळी दहा ते बारा भजन केले मंदिर प्रशासनाने सर्व भजनी मंडळाचा सन्मान करून पांडुरंगाचे दर्शनाची सोय केली व भोजन व्यवस्था केली.


यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक,  माजी आ.चंद्रशेखर कदम, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी भजनी मंडळाचे अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत