राहुरी फॅक्टरी तनपुरे कारखाना कार्यस्थळावरील नागेश्वर मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकड लंपास - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी तनपुरे कारखाना कार्यस्थळावरील नागेश्वर मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकड लंपास

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपरे कारखाना कार्यस्थळावरील आराध्य दैवत नागेश्वर मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून या...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपरे कारखाना कार्यस्थळावरील आराध्य दैवत नागेश्वर मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून यातील रोकड व परिसरातील वस्तू लंपास केल्याची घटना घडली आहे.



  डॉ.तनपुरे कारखाना मेनगेटपासून हाकेच्या अंतरावर नागेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या गेटचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून आतमध्ये प्रवेश करून मंदिरातील दानपेटी फोडून यातील रोकड व इतर वस्तू लंपास केल्या आहेत.


सकाळी दैनंदिन पूजा करण्यासाठी श्री.सुनील काळे गुरू व श्री.दहीभाते गुरू गेले असता त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. 


सध्या तनपुरे कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात असून या ठिकाणी जिल्हा बँकेचे सुरक्षा रक्षक कार्यरत आहे. तनपुरे कारखाना मेनगेटवर सुरक्षा रक्षक ड्युटीवर असताना अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नागेश्वर मंदिरात  मंदिराच्या दानपेट्या फोडण्यात आल्याने जिल्हा बँकेमार्फत असलेली खासगी सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा कमकुवत असल्याचे उघड झाले. 


तनपुरे कारखाना परीसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने जिल्हा बँकेची खासगी सुरक्षा यंत्रणा 'असून अडचण, नसून खोळंबा' या प्रमाणे झाली आहे. जिल्हा बँकेची खासगी सुरक्षा यंत्रणा कारखाना  परिसरातील चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यावर अयशस्वी ठरल्याने तनपुरे कारखाना कामगार वर्गातील सुरक्षा रक्षकांना सेवेत घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत