राज्याला आदर्शवत शिवजयंती सोहळा मुळाथडी परीसरात - लोकनेते गडाख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राज्याला आदर्शवत शिवजयंती सोहळा मुळाथडी परीसरात - लोकनेते गडाख

पानेगांव (वार्ताहर)   राज्याला हेवा वाटेल अशी शिवजयंती उत्सव सोहळा नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरातील पानेगांव,खुपटी,गोणेगांव, निंभारी, अं...

पानेगांव (वार्ताहर) 



 राज्याला हेवा वाटेल अशी शिवजयंती उत्सव सोहळा नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरातील पानेगांव,खुपटी,गोणेगांव, निंभारी, अंमळनेर,करजगांव वाटापूर, गणेशवाडी,खेडलेपरमानंद, तामसवाडी,आदी गावांमध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पानेगांव येथे शिवस्मारक समितीच्या वतीने  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यावेळी खरवंडी जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य अहमदनगर जिल्हा परिषद सभापती लोकनेते सुनिल गडाख पाटील बोलतं होते.

गडाख यांनी निंभारी येथील रॅलीचे विशेष कौतुक करुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी आठरा पगडं बारा बलुतेदार यांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आपण सर्वच बरोबर अहोत महापुरुषांचे विचार आपल्या जीवनात अमुलाग्र बदल घडून आपण यशस्वी प्रगती करणार असा आत्मविश्वास गडाख यांनी व्यक्त करुन उर्वरित विकासाचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचं सांगितलं.

शिवजयंतीच्या पुर्व संध्येला श्रीरामपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, सोनई पोलीस सपोनि माणिकराव भाऊसाहेब चौधरी पाटील, जेष्ठ पत्रकार विनायक दरंदले,यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.

यावेळी उपअधीक्षक मिटके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पानेगांव येथील अश्वारूढ पुतळा असल्याने मी ज्यावेळी कामानिमित्ताने जातं असतो त्यावेळी थांबवून दर्शन घेतो. त्यामुळे जिवनात नवचैतन्य मिळते.आमचं भाग्य असा कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली.

शिवजयंतीच्या निमित्ताने उद्योजक सुभाष जंगले, मुळा चे संचालक माजी लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले, पानेगांव माजी उपसरपंच रामराजे जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष किशोर जंगले, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, राजाराम बापू उद्योग समूहाचे अध्यक्ष सूरज जंगले, अंमळनेर  उपसरपंच अशोक मोरे, पोलीस पाटील अनिल माकोणे, माजी सरपंच हौशाबापू जंगले, रंगनाथ जंगले,जेष्ठ विधिज्ञ किरण जंगले, राजेंद्र जंगले, रासपचे जिल्हाप्रमुख नानासाहेब जुंधारे,मेजर रविंद्र जाधव, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब खंडागळे,संभाजी दौंड, विठ्ठल जाधव, बाळासाहेब जंगले,शुभम जंगले, सुनिल चिंधे, डॉ काकडे, भाऊसाहेब बडे, भाऊसाहेब बोर्डे, संजय वाघमारे, सुनिल भवार संजय पवार, महेश जंगले, गणेश जंगले, हितेश जंगले,संकेत गुडधे, विशाल जंगले,भाऊसाहेब काकडे,रघूनाथ जंगले, दिपक जंगले, महेश काकडे, अमोल जिवरक,जनार्दन गागरे, चंद्रकांत टेमक,तुकाराम चिंधे, संदिप जंगले, गणेश चिंधे, शिवाजी जंगले,महेश गुडधे, संकेत गुडधे, हर्षेल जंगले लक्ष्मीकांत जंगले,हरिष जंगले, रोहित जंगले,पोलीस काॅ,दहिफळे, थोरात,जावळे, वैभव झिने आदी सह शिवप्रेमी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत