साई आदर्श मल्टीस्टेटला बँको ब्लू पुरस्कार जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

साई आदर्श मल्टीस्टेटला बँको ब्लू पुरस्कार जाहीर

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  जिल्ह्यामध्ये अग्रगण्य असणाऱ्या व राहुरी फॅक्टरी येथे मुख्यालय असलेल्या व अगदी थोड्या कालावधीमध्ये आपलं नावलौकिक राज...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 जिल्ह्यामध्ये अग्रगण्य असणाऱ्या व राहुरी फॅक्टरी येथे मुख्यालय असलेल्या व अगदी थोड्या कालावधीमध्ये आपलं नावलौकिक राज्यासह परराज्यात पोहोचविणा-या साई आदर्श मल्टीस्टेट या पतसंस्थेस  “बँको    पतसंस्था पुरस्कार” 2023 जाहीर झाला आहे.


 महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात बळकटी आणणाऱ्या पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने   अविज  पब्लिकेशन्स, कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी बँको पुरस्काराचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या बँको पतसंस्था पुरस्कार 2023 साठी साई आदर्श मल्टीस्टेट ने सादर केलेल्या माहितीच्या आधारे तज्ज्ञ  निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार मल्टीस्टेट पतसंस्था विभागामध्ये बँको पतसंस्था पुरस्कारासाठी साई आदर्श मल्टीस्टेटची  निवड करण्यात आली आहे.




 या पुरस्काराचे वितरण दिनांक 17 मार्च रोजी हॉटेल एव्हर शाईन  रीसोर्ट महाबळेश्वर येथे करण्यात येणार आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले हा पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे संस्थेच्या प्रगतीसाठी गेले नऊ वर्षापासून आम्ही अविरतपणे झटत आहोत यामध्ये संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे ही मोठे सहकार्य लाभले आहे. सभासद, ठेवीदार यांनी मोठा विश्वास आमच्यावर टाकला आहे त्यास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत