राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता १२वी बोर्डाच्या प्रॅक्टिकल...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता १२वी बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षेदरम्यान कॉफी केल्याचा प्रकार घडल्याची चर्चा सध्या शैक्षणिक वर्तुळात घडत आहे. सदर हायस्कुलमधून दुसऱ्या शाळेत बदलून गेलेल्या एका प्राचार्याने काही शिक्षकांना हाताशी धरून हा सर्व प्रकार केल्याचे बोलले जात असून आज शिक्षणाधिकारी व पथकाने या हायस्कुलमध्ये सध्याचे प्राचार्य व शिक्षक यांची सखोल चौकशी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सध्या १२ वीची प्रॅक्टिकल परीक्षा सुरू आहे. त्यानुसार राहुरी तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये ही परीक्षा पार पडत असताना याच हायस्कुमधून काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या शाळेत बदलून गेलेल्या प्राचार्याने काही शिक्षकांना हाताशी धरून प्रॅक्टिकल पेपर फोडल्याची माहिती समजते.
दुसरीकडे बदलून गेलेल्या सदर प्राचार्याची मुलगी ही १२ वीला असल्याने तिला परीक्षा अवघड जाऊ नये म्हणून प्रॅक्टिकल प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ताब्यात घेऊन शिक्षकांना हाताशी धरून त्यांच्याकडून सर्व लिखाण करून घेतल्याचे चर्चेतून समजते. सदर प्राचार्यच्या मुलीने स्वतः प्रॅक्टिकल पेपर न लिहता शाळेच्या शिक्षकांनी(बदलून गेलेल्या प्राचार्याच्या मर्जीतले) लिहून दिला असल्याचे समजते.
दरम्यान ही माहिती राहुरी तालुका शिक्षण विभागाकडे पोहचल्याने शिक्षणाधिकारी श्री.नजन व श्री. गारुडकडर यांनी या शाळेत धाव घेऊन सध्याचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षकांची दोन तास कसून चौकशी केली आहे.
याबाबत ' आवाज जनतेचा' वेबटीमने शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला असता मला ही माहिती मिळाल्यामुळे मी हायस्कूलमध्ये दाखल झालो असून शिक्षकांची चौकशी केल्यानंतर वास्तव पुढे येणार असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे गुणिजन हा धक्कादायक प्रकार करत असल्याने 'कुंपणच शेत खात असल्याची' चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. शिक्षण विभागाने या प्रकाराची कसून चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
दोन शिक्षकांची मदत!
सदर हायस्कूलमधून बदलून गेलेले प्राचार्य यांच्या मुलीला सहकार्य करण्यासाठी हायस्कुलमधील दोन शिक्षकांनी पूर्णपणे मदत केली असून हे दोघेही 'त्या' प्राचार्याच्या काळात अगदी जवळ होते.त्यामुळे ते आता 'त्या' प्राचार्याच्या कन्येच्या मदतीसाठी सरसावले असल्याची कुजबूज यावेळी सुरू होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत