राहुरी तालुक्यातील करजगाव येथील जागृत देवस्थान भगवान कुबेरेश्वर महादेव मंदिरात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुक्यातील करजगाव येथील जागृत देवस्थान भगवान कुबेरेश्वर महादेव मंदिरात

मुसळवाडी (वेबटीम) - राहुरी तालुक्यातील करजगाव येथील प्रवरा नदी काठावरील पुरातनकालीन स्वयंभू जागृत देवस्थान ग्रामदैवत भगवान कुबेरेश्वर महादेव...

मुसळवाडी (वेबटीम) -

राहुरी तालुक्यातील करजगाव येथील प्रवरा नदी काठावरील पुरातनकालीन स्वयंभू जागृत देवस्थान ग्रामदैवत भगवान कुबेरेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कुबेरेश्वर महादेव देवस्थान समितीच्यावतीने देण्यात आली आहे. 

शनिवार १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी कावड मिरवणूक होऊन महादेवाची जलाभिषेक महापूजा ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येणार आहे. दिवसभर भाविकांना शाबूदाना खिचडीचा महाप्रसाद देण्यात येऊन रात्री गावातील भजनी मंडळाच्यावतीने महादेव मंदिरात भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी १९ फेब्रुवारी रविवार शिवजयंतीच्या दिवशी नामदेव महाराज शास्त्री, जातप यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर भाविकांना पारने उपवास सोडण्यासाठी महाप्रसाद देण्यात येणार आहे. तरी परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुबेरेश्वर महादेव देवस्थान समिती व समस्त ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत