राहुरीचे पोलिस निरीक्षक डांगे यांनी जनतेला केले 'हे' महत्त्वपूर्ण आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीचे पोलिस निरीक्षक डांगे यांनी जनतेला केले 'हे' महत्त्वपूर्ण आवाहन

राहुरी(वेबटीम) सध्या दहावी व बारावी परीक्षा कालावधी असून यादरम्यान उत्सव व विवाह सभारंभाची धामधूम सुरू आहे. मात्र हे सर्व साजरे करत असताना ड...

राहुरी(वेबटीम)



सध्या दहावी व बारावी परीक्षा कालावधी असून यादरम्यान उत्सव व विवाह सभारंभाची धामधूम सुरू आहे. मात्र हे सर्व साजरे करत असताना डी.जे न लावता पारंपारिक वाद्य वाजवून आनंद साजरा करावा असे आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी केले आहे.


 पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी   राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले की, थोड्याच दिवसात दहावी बारावीच्या परीक्षा सुरू होत असून कोणत्याही कार्यक्रमात उशिरापर्यंत चालणाऱ्या डीजेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो. त्याचप्रमाणे आजारी व वयस्कर व्यक्ती यांना डीजे पासून शारीरिक त्रास होत असतो. तरुण मुले नशा करून डीजेच्या संगीतावर वेडावाकडा डान्स करीत असतात. एकंदरीत वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता कोणत्याही कार्यक्रमात डीजे पेक्षा पारंपारिक वाद्याची निवड करणे योग्य राहील. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्याकडे आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमात डीजे पेक्षा कृपया पारंपारिक वाद्याचीच निवड करावी.



       सर्व मंगल कार्यालय मालक /चालक यांनी देखील कोणत्याही कार्यक्रमाची ऑर्डर घेताना त्या ठिकाणी डीजे चा वापर होणार नाही ही पहिली अट ठेऊनच ऑर्डर घ्यावी जेणेकरून नंतर कोणालाही तक्रार करण्याची संधी मिळणार नाही याची  खबरदारी घेऊन सर्वांनी आपला राहुरी तालुका डीजे मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन डांगे यांनी केले आह.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत