लातूर(वेबटीम) तालुक्यातील पिंपरी आंबा परिसरातील शिवारात असलेल्या घराचा दरवाजा तोडुन आतील सोन्या चांदिचे दागिने व संसारोपयोगी साहित्य असा १...
लातूर(वेबटीम)
तालुक्यातील पिंपरी आंबा परिसरातील शिवारात असलेल्या घराचा दरवाजा तोडुन आतील सोन्या चांदिचे दागिने व संसारोपयोगी साहित्य असा १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात गातेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी आंबा शिवारात सोपाबाई दत्ता भिसे यांचे घर आहे. घर बंद करुन त्या बाहेरगावी आल्या होत्या. दरम्यान,त्यांची मुलगी काही साहित्य घेऊन येण्यासाठी शेतातील घरी गेली असता त्यांना घराचा दरवाजा काढून बाजुला ठेवल्याचे निदर्शनास आले. तसेच, घरातील सामान अस्ताव्यस्त टाकून कपाटातील सोन्याचे गंठण, झुमके, सोन्याची कानातील फुले, पितळेचे पातेले, जर्मनचे डबे, गॅस सिलेंडर असा एकूण १ लाख ५ हजार १० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या संदर्भात सोपाबाई भिसे यांनी त्यांच्या परिचयाचे हाणमंत पांडुरंग भिसे, त्याची पत्नी शिवकन्या हाणमंत भिसे व नानासाहेब विठ्ठल भिसे (सर्व रा. पिंपरी आंबा ता. लातूर) यांनी चोरी केल्याची तक्रार गातेगाव पोलिसांत दिली असुन या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*पोलिसांची भूमिका संशयास्पद!*
दरम्यान याप्रकरणी जरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपीना अटक होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त होत असून ' अर्थ' पूर्ण संबंधामुळे पोलिड कारवाई करत नसल्याचा आरोप फिर्यादीकडून होत असून याप्रश्नी जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन देणार असल्याचे समजते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत