राहुरी (प्रतिनिधी) स्नेहसंमेलन सारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नक्कीच वाव मिळतो हे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे आपला पाल्य ...
राहुरी (प्रतिनिधी)
स्नेहसंमेलन सारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नक्कीच वाव मिळतो हे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे आपला पाल्य सोशल मीडियाच्या जाळ्यापासून दूर राहण्यासाठी शिक्षक व पालकांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राहुरीचे पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील अष्टविनायक इंग्लिश मिडियम स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब पेरणे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक, प्रा.डॉ.पांडुरंग कंद, पुणे विद्यापीठाचे प्रा.स्वामीराज भिसे, माजी संचालक उत्तमराव म्हसे, अष्टविनायक इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक भास्करराव होन, प्रिन्सिपल मोहनीराज होन, उपसरपंच ज्ञानेश्वर खिलारी, ऍड भाऊसाहेब पवार, जेष्ठ पत्रकार वसंतराव झावरे, राहुरी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष विनीत धसाळ, ग्रा.पं.सदस्य विक्रम पेरणे, अमोल पेरणे आदी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक डांगे म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मोठी स्वप्ने ठेवल्यास यश निश्चित मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.डॉ. पांडुरंग कंद यांनी सांगितले की, एकमेकांशी मोकळा सुसंवाद होण्यासाठी तसेच सोशल मीडियाच्या गर्तेतून विद्यार्थी बाहेर पडण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईलची गरज नसेल तर देऊ नये. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पालक व शिक्षकांनी सामूहिक प्रयत्न करावेत. स्कूलचे प्रिन्सिपल मोहनीराज होन यांनी शाळेच्या वाटचालीविषयी माहिती दिली. शाळेचा दहावीचा सलग सात वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा कायम असून संस्थेच्या बाहेर गेलेले विद्यार्थी वैद्यकीय अभियांत्रिकी तसेच इतर उच्च क्षेत्रात नावलौकिक मिळवत असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गीतांनी उपस्थित पालक व ग्रामस्थांची मने जिंकली. विविध क्षेत्रातील पदाधिकारी पालक, महिला व ग्रामस्थ, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत