देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा इरिगेशन बंगला येथील श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिरात गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित गजानन विज...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा इरिगेशन बंगला येथील श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिरात गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित गजानन विजय पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवास भाविकांचा प्रतिसाद मिळत असून अन सोमवारी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प भागवत महाराज उंबरेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे.
श्रीराम मित्र मंडळ, आदीनाथ सेवा मंडळ, श्री गजानन माऊली महिला मंडळ व हिंदू रक्षक धर्म परिषद धार्मिक व सामाजिक संघटना यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पारायण, हरिपाठ, कीर्तन, आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे.
आज सोमवारी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथील भागवत महाराज उंबरेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार असून भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत