सात्रळच्या कडू पाटील विद्यालयाची गरुडझेप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळच्या कडू पाटील विद्यालयाची गरुडझेप

सात्रळ(वेबटीम)  रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ ता राहुरी येथील इ. ९ वी व१० वी च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्...

सात्रळ(वेबटीम)



 रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ ता राहुरी येथील इ. ९ वी व१० वी च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र युवा खेळ परिषद क्रीडा स्पर्धेमध्ये गरुड झेप घेतली आहे.यात लांब उडी व  १०० मीटर धावणे १७ वर्ष वयोगटातील राहुल शिंदे तर ४०० मीटर धावणे १७ वर्ष वयोगटात अथर्व बनगये, क्रिकेटमध्ये कृष्णा सिनारे, हर्षद हुलुळे, कुणाल कोहकडे,प्रमोद भुसारी,या विद्यार्थ्यांनी यवतमाळ येथे झालेल्या महाराष्ट्र युवा खेळ परिषद क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन क्रीडा स्पर्धेमध्ये गरुडझेप घेत राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा मान पटकावला आहे.

        यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा विभागप्रमुख विलास गभाले,मार्गदर्शक शिक्षक श्री.पुरब सुर्यवंशी,जालिंदर बनगये जेष्ठ शिक्षक त्रिंबक राशिनकर, सच्चिदानंद झावरे, केशव मुसमाडे,युनूस पठाण, भारत कोहकडे,संजय दिघे,प्रकाश कुलथे,सतिश नालकर,सुनिता ढोकणे,गिताजंली गोसावी,प्राजंली फरकाडे,पल्लवी गावडे,सुदर्शन गिते, कविता वदक,सविता जेजूरकर सुमेध शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

           यशस्वी विदयार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे,उपाध्यक्ष अरुण कडू पाटील प्रगती पतसंस्थेचे चेअरमन,विजयराव कडू स्कूल कमिटीचे संभाजीराव चोरमुंगे पा. ,बबनराव कडू पा.भास्कर फणसे, किशोर भांड,विद्यालयाचे प्राचार्य किशोर ससाणे ,पर्यवेक्षक श्रीम.थोरात एस.आर, विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद,स्थानिक स्कुल कमिटी,शाळा व्यवस्थापन समिती, शालेय व्यवस्थापन व विकास समिती,माता पालक संघ , शिक्षक पालक संघ ,सर्व ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत