अंमळनेर सोसायटीच्या चेअरमनपदी किरण कोळसे तर व्हा. चेअरमनपदी राहुल डुकरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अंमळनेर सोसायटीच्या चेअरमनपदी किरण कोळसे तर व्हा. चेअरमनपदी राहुल डुकरे

आंबी(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त असलेल्या अंमळनेर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी उपसरपंच किरण व...

आंबी(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त असलेल्या अंमळनेर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी उपसरपंच किरण वसंतराव कोळसे तर व्हा. चेअरमन पदी राहुल डुकरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती एस. डी. माने यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव गिताराम काळे व अशोक निमसे यांनी काम पाहिले.

निवडीनंतर संस्थेचे सभासद दत्तात्रय रोडे यांची आदर्श पतसंस्थेच्या तर आंबीचे उपसरपंच विजय डुकरे यांची धन्वंतरी रुग्णालय व महाविद्यालय कामगार पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने स्नेह सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अंमळनेर सेवा संस्थेचे प्रवर्तक व राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे जेष्ठ संचालक वसंतराव कोळसे, माजी चेअरमन बापूराव जाधव, उद्धव कोळसे, भाऊसाहेब साळुंके, सर्व संचालक, कोंडराम साळुंके, किसनराव साळुंके, बाळासाहेब साळुंके, बाळासाहेब डुकरे, बी. एल. साळुंके, बाळासाहेब जाधव, अरुण काळे, सुनिल औताडे, भाऊसाहेब साळुंके, प्रवीण डुकरे, आदिनाथ डुकरे, गोविंद डुकरे, निखिल डुकरे, अफजल इनामदार, राम निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य भीम कोळसे, दादासाहेब साळुंके, योगेश डुकरे, रमेश कोळसे, आप्पा डुकरे, भागवत कोळसे, काकासाहेब डुकरे, अशोक साळुंके, संदिप डुकरे, शंकर डुकरे, प्रतिक डुकरे, नरेंद्र डुकरे, शुभम डुकरे, सोपान डुकरे, केशव साळुंके, सखाराम रोडे, पत्रकार विश्वनाथ जाधव आदी उपस्थित होते. शेवटी दादासाहेब साळुंके यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत