श्रीरामपूर(web team) श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी या शिक्षक संस्थेच्या माध्यमिक विभागातील सेवा ज्येष्ठता यादी शासकीय नियमानुसार अद्यावत केल...
श्रीरामपूर(web team)
श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी या शिक्षक संस्थेच्या माध्यमिक विभागातील सेवा ज्येष्ठता यादी शासकीय नियमानुसार अद्यावत केलेली नसल्यामुळे संस्थेतील माध्यमिक शिक्षकाची पदोन्नती, वेतनश्रेणी व इतर सेवा विषयक बाबींमध्ये अनियमितता आहे. त्यामुळे अनेक सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला असून शासनाने निर्देशित केलेल्या नियमाप्रमाणे सेवा ज्येष्ठता यादी अद्यावत करावी व अन्यायग्रस्त शिक्षकांवरील अन्याय दूर होऊन त्यांना पदोन्नती व इतर सर्व सेवा लाभ द्यावेत या मागणी साठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघांच्या प्रोटान या शिक्षक विंगच्या माध्यमातून संस्थेच्या कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे राज्य महासचिव रमेश मकासरे, पुणे विभाग कार्यकारिणी सदस्य विनोद राऊत, आरएमबीकेएस आरोग्य विभागाचे राज्य कार्याध्यक्ष सुरेश गवई, जिल्हा सचिव एस. के. बागुल, प्रोटॉन तालुकाध्यक्ष शाकिर शेख, एकलव्य भिल्ल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रमादेवी धिवर, शहराध्यक्ष विजय पवार, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा महासचिव फ्रांसिस शेळके, नगरसेविका जयश्री शेळके, भीम गर्जनाचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज पठाण , विद्रोही विद्यार्थी संघटनेचे अमोल सोनवणे, राजू लोंढे, श्याम रणपिसे, बाबासाहेब थोरात, सर्जेराव देवरे, जयराम पठारे, एल. एन. म्हस्के, रईस शेख, प्रकाश सपकाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
"आज फक्त एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे. प्रश्नांची सोडवनुक न झाल्यास नजीकच्या काळात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विरोधात याही पेक्षा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल. त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास श्रीरामपूर एज्युकेशन संस्था जबाबदार राहील."
- रमेश मकासरे (राज्य महासचिव, आरएमबीकेएस ट्रेंड युनियन)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत