हसन सय्यद यांचे मध्यप्रदेश ग्वालीयरच्या ऐतिहासिक भूमीत व्याख्यान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

हसन सय्यद यांचे मध्यप्रदेश ग्वालीयरच्या ऐतिहासिक भूमीत व्याख्यान

राहुरी फॅक्टरी   महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवव्याख्येते तसेच राहूरी फॅक्टरी येथील भूमिपुत्र शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे व्याख्यान शिवजयंतीच...

राहुरी फॅक्टरी 



 महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवव्याख्येते तसेच राहूरी फॅक्टरी येथील भूमिपुत्र शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे व्याख्यान शिवजयंतीचे औचित्य साधून रविवार दि. २६ फेब्रुवारी २३ रोजी सांय. ०५:३० वा.मध्यप्रदेश मधील ऐतिहासिक भूमी म्हणून असलेली ग्वालीयर येथे तुलसी मानस प्रतिष्ठान-ग्वालियर (मध्यप्रदेश) प्रेरणास्थान श्रद्धेय डॉ. रघुनाथ राव पापरीकर मानस भवन फुलबाग-ग्वालियर (मध्य प्रदेश) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आणि महाराष्ट्र समाज व समिती सदस्य प्रसिद्ध अभिनेते आर.के जगताप तसेच मध्यप्रदेश येथील ख्यातनाम युवा उद्योजक प्रवीण जगताप वतीने व्याख्यान होणार आहे.



          आज पर्यंत शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्या अनोख्या शैलीतील मांडणी नुसार शेकडोहुन अधिक शिवरायांचे जाज्वल्य इतिहास सांगून श्रोत्यांना शिवदर्शन घडवले. शिवाजी महाराजांचा इतिहास समाजातील प्रत्येक जाती धर्मा पर्यंत पोहचला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांचे प्रबोधन कार्य अविरत सुरू आहे, शिवरायांचे गडकोट किल्ल्यावर जाणे प्रत्येक्षात शिवराय अनुभवणे, लहान मुलांना शिवरायांच्या प्रेरणादायी कथा सांगणे, शिवरायांच्या विविध पैलूवर लिखाण करणे, विविध साहित्य संम्मेलनात सहभाग घेणे, असे अनेक उपक्रम शिवरायांचे मुस्लिम शिवभक्त हसन सय्यद करत असतात, 

          आज शिवरायांचा जाज्वल्य इतिहास थेट महाराष्ट्र बाहेर मध्यप्रदेशच्या ऐतिहासिक भूमीत जेथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, यांनी रणमैदान गाजवले तिथेच पुन्हा महाराष्ट्राचा इतिहास शिवजयंती निमित्ताने गर्जनार आहे.

              एकिकडे दोन समाजामध्ये राजकीय मतभेद मुळे या ना त्या कारणाने हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये मन दुभंगत असताना अश्यावेळी आधुनिक काळातील शिवरायांचा मुस्लिम मावळा शिवव्याख्येते हसन सय्यद हे सामाजिक बांधिलकी जपून महापुरुषांचे विचार घेऊन देशातील महाराष्ट्र राज्यासह परराज्यातही समतादूत ठरत आहे,  राजकीय, धार्मिक व सामाजिक अश्या सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक व सन्मान होत आहे. तसेच मध्यप्रदेश मधील त्यांच्या व्याख्यानासाठी व त्यांच्या या शिवकार्यातून समाज जोडण्याचे महान कार्यास त्यांचे मित्र परिवार व हितचिंतक त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव ही करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत