उंबरे गाव होणार प्लास्टीक मुक्त ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरे गाव होणार प्लास्टीक मुक्त !

उंबरे(वेबटीम)   केंद्र आणि राज्य सरकार पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमही सुरू आहेत. मात्र, ही ...

उंबरे(वेबटीम)



  केंद्र आणि राज्य सरकार पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमही सुरू आहेत. मात्र, ही फक्त सरकारची जबाबदारी नसून, एक सामाजिक जाण म्हणून आपणही पुढे येण्याची गरज आहे, यादृष्टीकोनातूनच उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठाणने ‘प्लास्टीक मुक्त घर, प्लास्टीक मुक्त गाव’ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भविष्यात जिल्हाभर प्रतिष्ठाणच्या वतीने यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. काल शिवजयंतीच्या दिवशी प्रतिष्ठाणने हा संकल्प केला आहे.


    शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांना काल अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती प्रतिष्ठाणच्या पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. यात आगामी वर्षभरात करायवयाच्या कामांची रुपरेषा ठरविण्यात आली.  प्रारंभी प्लास्टीक मुक्तीच्या चळवळीला गती देतानाच, सर्वप्रथम उंबरे गावापासून सुरुवात करण्याचा निर्धार करण्यात आला. आगामी तीन वर्षांत जास्तीत जास्ते गावे प्लास्टीक मुक्तीचा मायक्रो प्लॅन तयार केला जाणार आहे. त्यासाठी युवकांना सहभागी करून घेतले जाईल. शाळा, महाविद्यालयात मुलांमध्ये जागृती केली जाईल. तसेच देशभरात 2023 हे वर्षे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे साजरे होत आहे. त्यासाठी छत्रपती प्रतिष्ठाणच्या वतीने संबंधित 12 तृणधान्यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व पटवून देतानाच त्याचे उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठीही तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. शाळेतील मुलींच्या बदलत्या वयोगटानुसार ‘कन्या-माता’ मेळावा’ घेवून त्यात तज्ज्ञ महिला डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल, मुलींसाठी मोफत सॅनेटरी नॅपकीन पुरविण्यावरही यावेळी विचार झाला, युवकांसाठी स्वयंरोजगार मेळावे घेणे, त्यासाठी विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या मदतीने कार्यक्रम घेणे, कीर्तन महोत्सवाप्रमाणेच तीन दिवशीय ‘छत्रपती व्याख्यानमाला’चे आयोजन करणे, क्रीडा स्पर्धा भरविणे, मुलांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी पाठपुरावा करणे, शालेय मुलांना साहित्य वाटप करणे, शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांना मदत करणे, करपरा नदी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेणे, जिल्हा रुग्णालयाच्या मदतीने गावात लहान मुलांसाठी शिबीर घेणे, आगामी पुरस्कार वितरण तारीख निश्चित करणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी अध्यक्ष लक्ष्मण पटारे, उपाध्यक्षा विद्याताई करपे, विलासराव ढोकणे, दीपकराव पंडीत, शरद ढोकणे, संदीप गायकवाड, सोपान ढोकणे, शरद वाघ, विलास गरुड, संदीप ढोकणे, सचिन शेजूळ, राहुल पाटील, गोरक्ष ढोकणे, गणेश आलवणे, आकाश साबळे आदी उपस्थित होते.


 राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्यावर दुतर्फा झाडे!

 पावसाळ्यात चांगल्या प्रकारे झाडे उगवतात. त्यामुळे या वर्षी जुनमध्ये राहुरीचा सोनई फाटा ते शनिशिंगणापूर अशा 25 कि.मी. रस्त्यावर दुतर्फा झाडे लावून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा मोठा निर्णय देखील कालच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी आतापासूनच प्लॅनिंग केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत