राहूरी फॅक्टरी येथील चोथे वस्ती येथे रविवारपासून साई पारायण सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरी येथील चोथे वस्ती येथे रविवारपासून साई पारायण सोहळा

राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील जुन्या देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी रोडवरील चोथे वस्ती पेपर मिल रोड येथे  रविवार १२ ते १९ फेब्...

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील जुन्या देवळाली प्रवरा ते राहुरी फॅक्टरी रोडवरील चोथे वस्ती पेपर मिल रोड येथे  रविवार १२ ते १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान चोथे वस्ती परिसरातील नागरिक व भारत चोथे मित्र मंडळाच्या श्री. साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.



       राहूरी कारखाना नजीक असलेल्या चोथे वस्ती येथील भारत चोथे मित्र मंडळाच्या वतीने रविवार १२ फेब्रुवारी ते रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान श्री साई चरित्र पारायण सोहळा संपन्न होणार असून या निमित्ताने दररोज सकाळी ८ ते १० यादरम्यान ग्रंथवाचन होणार आहे. दररोज सकाळी १० , दुपारी १२,  सायंकाळी ७ व रात्री १० वाजता श्रींची आरती केली जाणार आहे. तसेच  ७ ते ९ या वेळेतप्रवचन व कीर्तन संपन्न होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी सुभाष महाराज शास्त्री, १३ फेब्रुवारी रोजी नामदेव महाराज शास्त्री, १३ फेब्रुवारी रोजी बाबासाहेब महाराज कोळसे, महेश महाराज खाटेकर, संजय महाराज शेटे यांचे प्रवचन तर  १७ फेब्रुवारी रोजी श्रीकांत महाराज गागरे व १८ फेब्रुवारी रोजी बाबा महाराज मोरे यांचे कीर्तन होणार आहे.



    रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता ग्रंथ अवतरणिका तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व  सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महंत उद्धव महाराज मंडलिक(नेवासेकर) यांचे काल्याचे जाहीर हरिकीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.



 या पारायणास व्यासपीठ चालक म्हणून साई भक्त श्रीनिवास सहदेव, राहुरी हे सेवा देणार असून पारायण सोहळ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी दत्तात्रय मोरे, दीपक चोथे, अनिल थोरात, गणेश एकनाथ चोथे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत