राहुरी फॅक्टरीत प्रजपिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्यावतीने शिव संदेश शोभा यात्रा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत प्रजपिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्यावतीने शिव संदेश शोभा यात्रा

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील प्रजपिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेंटरच्यावतीने राहुरी फॅक्टरी परिसरात भव्य दिव्य ...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)

राहुरी फॅक्टरी येथील प्रजपिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेंटरच्यावतीने राहुरी फॅक्टरी परिसरात भव्य दिव्य शिव संदेश शोभा यात्रा काढण्यात आली.


या रॅलीद्वारे परिसरातील प्रत्येक घरामध्ये शिव परमात्म्याचा संदेश देण्यात आला  सर्व आत्म्याचे पिता एक (धर्म अनेक पिता परमात्मा एक) जिवंत देखावा सादर करण्यात आला. 


तसेच चौका चौकात, विविध शाळांमध्ये  व्यसन मुक्तीबाबत पटनाट्य सादरीकरण करून जनजागृती करण्यात आली.


या रॅलीचे उद्घाटन ब्रम्हाकुमारी ज्योती दीदी, माजी नगरसेविका सुजाता कदम, डॉ.कांचन शेकोकर व मान्यवरांच्या हस्ते पार पडले.



 संपूर्ण राहुरी फॅक्टरी परिसरातून काढण्यात आलेल्या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्यने महिला व पुरुष या रॅलीत सहभागी झाले होते.




पथनाट्य सादरीकरण करण्यासाठी संदीप गाडेकर, रवी कटारे, सूचित बडे, ऋषी भांड, प्रसाद शेटे यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत