राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील वरवंडी येयहील श्री गाडगे महाराज आश्रमशाळा येथे मुंबई येथील नितीनजी दळवी यांच्या प्रेरणेतून व सहकार्यातून...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील वरवंडी येयहील श्री गाडगे महाराज आश्रमशाळा येथे मुंबई येथील नितीनजी दळवी यांच्या प्रेरणेतून व सहकार्यातून चित्रकला, निबंध, संगीतखुर्ची, लिंबू- चमचा इ.स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य दहा दिवसापूर्वीच मुंबई येथून शाळेत पाठविण्यात आले होते. बक्षीस वितरण समारंभादिवशी मा. नितीनजीवी यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या हस्ते बाबांच्या पुतळयाचे पूजन करण्यात आले तसेच विठ्ठल-रखुमाई मंदिरात त्यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.
यावेळी त्यांनी मंदिराची पाहणी केली व कळसाची सद्यस्थिती पाहता जिर्नोध्दाराचा मानस व्यक्त केला.
याप्रसंगी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. प्रत्येक वर्गात या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना विविध बक्षीसांचे वितरण करण्यात आले तसेच प्रश्नमंजुषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मा. नितीनजी दळवी यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून उत्तरे घेतली. विजेत्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे बक्षीसे वितरीत करण्यात आली.
तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेतील कर्मचारी व महिला यांना गणवेश, साडया व डायरी पेन यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आश्रम शाळेतील मंदिर जिर्णोध्दाराबरोबरच इतरही सहकार्य केले जाईल अशा भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री प्रविणाजी देशमुख, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका शिक्षक, अधिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत