यात्रेनिमित बैलगाडा शर्यत भरविणाऱ्यांवर राहुरी पोलिसांची कारवाई - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

यात्रेनिमित बैलगाडा शर्यत भरविणाऱ्यांवर राहुरी पोलिसांची कारवाई

राहुरी(वेबटीम) जिल्हाधिकारी यांची परवानगी नसताना  राहुरी तालुक्यातील चिंचाळे फाटा येथे बिरोबा देवस्थान यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत  भरविणाऱ्...

राहुरी(वेबटीम)



जिल्हाधिकारी यांची परवानगी नसताना  राहुरी तालुक्यातील चिंचाळे फाटा येथे बिरोबा देवस्थान यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत  भरविणाऱ्या चौघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत माहिती अशी की, ताहाराबाद रोड लगत चिंचाळे फाटा सोमवारी बिरोबा देवस्थानची यात्रा होती. या यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी यांची कुठलीही परवानगी नसताना बैलगाडा शर्यत भरविल्याची माहिती पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांना मिळाली.त्यानुसार पोलीस यात्रेस्थळी दाखल झाले असता ४० ते ५० बैलगाडा धावकांच्या मदतीने घोडे बैलगाडा हारजीतची शर्यत लावून गाड्यांना जुंपलेल्या घोडे ,बैलांना अधिक वेगाने पळावे याकरिता त्यांना बैलगाडा धारकांनी त्यांचे हातातील चाबकाने घोडे ,बैलांचे पाठीवर पायावर मारून तसेच त्यांचे शेपटा पीरघळून त्यांना अधिक वेगाने पाळण्याकरिता त्यांना क्रूरपणे वागवून शर्यत घेऊन स्वतःचे तसेच तेथील लोकांचे मनोरंजनाकरिता शर्यत घेताना मिळून आलेले.


दरम्यान याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल  जानकीराम खेमनर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात सोन्याबापू चिमाजी कोळसे, बापूसाहेब राणोजी गडदे, योगेश सोपान गडदे , संदीप भागवत बाचकर (सर्व रा. गडदे आखाडा,ता.राहुरी) या चौघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भादवि कलम १८८, प्राण्यांना निर्दयतेने वागविणेस प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक रामनाथ सानप करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत