श्रीरामपूर जिल्हा करून नगर शहराला माऊलीनगर नामांतरसाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांना निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर जिल्हा करून नगर शहराला माऊलीनगर नामांतरसाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात जिल्ह्याचे वेळ प्रसंगी त्रिभाजन करा. मात्र प्रायोगिक तत्वावर श्रीरामपूर जिल्हा एकदाचा ...

श्रीरामपूर (प्रतिनिधी)



येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात जिल्ह्याचे वेळ प्रसंगी त्रिभाजन करा. मात्र प्रायोगिक तत्वावर श्रीरामपूर जिल्हा एकदाचा घोषित करा. तसेच नगर शहराचे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनगर नामांतर व्हावे. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांचेसह खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील आणि खा. सदाशिव लोखंडे यांना पसायदान बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आणि श्रीरामपूर जिल्हा कृती समिती उपाध्यक्ष राजेंद्र लांडगेंनी सामाजिक भावनेतून निवेदन दिले.



प्रसिद्धी पत्रकात राजेंद्र लांडगे म्हणाले कि, महसूल परिषद-२०२३ निमित्ताने मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री लोणी येथे आले होते. कार्यक्षम महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आयोजित केलेल्या महसूल परिषद निमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारची उपस्थिती जिल्हा विभाजनाला पोषक ठरू शकतेय.

आजमितीला अनेक शहराचे नामकरण झाले. या पार्श्वभूमीवर ७२६ वर्षांपूर्वी जिल्ह्यात नेवासा येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींने ज्ञानेश्वरी लिहिली आहे. म्हणून सामंजस्यातून नगर शहराला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीनगर नामांतर केल्यास ऐतिहासिक निर्णय होईल. 

तसेच जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला आहे. त्यांचे कार्य देशभर सर्वश्रुत आहे. म्हणून अधिवेशनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना मरणोत्तर भारतरत्न देणेचा निर्णय होणं अपेक्षित आहे.हा निर्णय झाल्यास सामाजिक बांधिलकीच दर्शन घडणार आहे.

एकंदरीत वेळ प्रसंगी शासनाचा जिल्ह्याचे त्रिभाजन करणे हा पर्याय सर्वार्थाने हितावह ठरू शकतोय.आणि निकषाचे आधारे श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी आणि नगर शहराचे माऊलीनगर नामांतर तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना भारतरत्न देणेसाठी एकत्रित निर्णय होणं अपेक्षित आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षीय आजी-माजी लोकप्रतिनिधींनीसह सरपंच-उपसरपंच, आध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर,विविध प्रतिष्ठानें, विविध संघटनेचे प्रतिनिधीनीं केलेले ठराव किंवा सह्यांचे पाठींबा पत्र देऊन लोकसहभाग नोंदवावा असे आवाहन आमचे प्रतिनिधींशी बोलतांना राजेंद्र लांडगे यांनी शेवटी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत