राहुरी फॅक्टरीतील शिवाजी प्राथमिक विद्यालयाची शिवजयंती उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील शिवाजी प्राथमिक विद्यालयाची शिवजयंती उत्साहात

राहुरी(वेबटीम) शिवराय मनामनात-शिवजयंती घराघरात ' या अभिनव संकल्पनेतून राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालयाने नाविन्यपूर्ण अशी ...

राहुरी(वेबटीम)



शिवराय मनामनात-शिवजयंती घराघरात ' या अभिनव संकल्पनेतून राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालयाने नाविन्यपूर्ण अशी शिवजयंती साजरी केली.






छत्रपती शिवाजी महाराजआ यांच्या पुतळ्यास शाळेच्या वतीने पुष्पहार अर्पण केला गेला.नंतर शाळेत शिवजयंती उपक्रमात प्रारंभी श्री.देशमुख सर यांनी शिवगर्जना देऊन राष्ट्रमाता जिजाबाई,छ.शिवाजी महाराज,छ.संभाजी महाराज,महाराणी सईबाई,शिवरायांचे शूरवीर सरदार,अंगरक्षक व मावळे यांच्या वेशभूषेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रवेश केला.त्यांच्यावर पुष्प वर्षाव करून जोरदार घोषणाबाजी झाली.


या उपक्रमासाठी अ.नगर जिल्हा काँग्रेस सचिव श्री.अजय खिलारी,श्री.राजेंद्र बोरुडे,श्री.सचिन निमसे,श्री.विवेक खेडकर,श्री.बाळासाहेब लोखंडे,श्री.बाळासाहेब आढाव,श्री.संदीप महाडिक,श्री.योगेश आंबेडकर सर,श्री.ज्ञानेश्वर देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.छ.शिवाजी महाराजांची अतिथी व शाळा सर्व शिक्षक आणि पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रतिमपूजन व आरती झाली.त्यांनतर ' जय जय महाराष्ट्र माझा ' हे राज्य गीत झाले.विद्यालयाच्या वतीने अतिथींचा व माजी विद्यार्थी आवाज जनतेचा संपादक श्री.श्रीकांत जाधव यांचा सन्मान झाला.


माजी विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडू कु.भक्ती पवळ,प्रज्ञा गडाख,हर्षल कदम,व नुकतेच पोस्ट ऑफिसमध्ये निवड झालेले निशांत चव्हाण,माजी विद्यार्थी फार्मासिस्ट प्रणाली लोंढे,माजी गुणवंत विद्यार्थी ओंकार व अथर्व आयनर यांचा सन्मान झाला.


पुढे सांस्कृतिक उपक्रमात अद्विका देशमुख,सोनाली वराळे,प्रसाद खंदारे,नील खामकर,सिद्धी लोंढे,वेदांती खांदे,श्रेयस आल्हाट,अथर्व पुंड,संग्राम झांबरे यांची तडफदार भाषणे झाली.यशश्री बानकर,सार्थक जाधव यांनी शौर्य गीते व राम जाधव याने पोवाडा सादर केला.इयत्ता २ री च्या विद्यार्थ्यांनी ' राज आलं ' या गीतावर नृत्य सादर केले.श्री.अजय खिलारी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप पार पडले.अतिथी मनोगत मध्ये श्री.राजेंद्र बोरुडे व श्री.अजय खिलारी यांनी शाळा व्यवस्थापन व संपूर्ण कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक करून याच शाळेने अनेक पदाधिकारी घडविल्याचा उल्लेख केला.


शाळेच्या डिजिटल उपक्रमासाठी नूतन निर्वाचित नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा.श्री.सत्यजित दादा तांबे यांच्या माध्यमातून शाळेला २ LED TV उपलब्ध करून देण्याचे श्री.अजय खिलारी यांनी आश्वसन दिले.


आपल्या पाल्याचे कलागुण पाहण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.आवारे मॅडम यांची प्रेरणा,उपा.कोहकडे मॅडम,राशीनकर सर,सुपनर मॅडम,जाधव ए.के.सर,साबळे मॅडम,डांगे मॅडम,सोनवणे सर,जाधव के.के.सर,शिंदे मॅडम,होन मॅडम,शेटे मॅडम,थोरात सर,ढेसले मामा यांनी अतोनात कष्ट घेतले.उपक्रमाची रूपरेषा,सूत्रसंचालन व सर्वांचे आभार श्री.देशमुख सर यांनी मानले.


शेवटी येत्या शुक्रवारी २४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता शाळेची गॅदरिंग आयोजित केली असून पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे नम्र आवाहन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत