धरणग्रस्त सेवा संघ पिंपळगाव लेप अध्यक्षपदी राजेंद्र माळी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धरणग्रस्त सेवा संघ पिंपळगाव लेप अध्यक्षपदी राजेंद्र माळी

येवला(वेबटीम)  संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या धरणग्रस्त सेवा संघ येवला व नाशिक परिसराच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहे. या ...

येवला(वेबटीम)



 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या धरणग्रस्त सेवा संघ येवला व नाशिक परिसराच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहे. या भागात सेवा संघाचे कार्य जोमाने वाढविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.

धरणग्रस्त सेवा संघ पिंपळगाव लेप अध्यक्षपदी राजेंद्र माळी यांची निवड करण्यात आली आहे.



धरणग्रस्त सेवा संघाच्या महाराष्ट्र अध्यक्ष अँड. सिंड्रेला परेरा यांच्या सहीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यावेळी नगर जिल्हाध्यक्ष सागर सावंत, नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश खळे, येवला तालुकाध्यक्ष दामू माळी,  जयशी मढवई आदी उपस्थित होते



 नूतन पदाधिकाऱ्यांत धरणग्रस्त सेवा संघ पिंपळगाव लेप अध्यक्षपदी राजेंद्र माळी तर सदस्यपदी नितीन गावडे, अरुण वाघ, अनिल गोधडे, नाना गोधडे, विठ्ठल गोधडे, केदारनाथ भवर, नितीन रसाळ, मारुती गोधडे, लक्ष्मीक गायकवाड, दत्तू मोरे, ज्ञानेश्वर मोरे, गोरख मोरे, बाळू माळी, सागर गोधडे, परसराम गोधडे, प्रल्हाद माळी, आशा वाघ, अशोक भवर यांची निवड करण्यात आली.


संपुर्ण महाराष्ट्र भर धरणग्रस्त सेवा संघ भूमिहीन, अल्पभूधारक, गायरान जमीन धारक, गोरगरीब , दिन दुबळ्या व शोषित समाजासाठी काम करत असून येवला तालुक्यातील नवीन पदाधिकारी यांनी तळागाळातील नागरिकांशी संपर्क करून त्यांना या प्रवाहात समविष्ट करावे असे आवाहन महाराष्ट्र अध्यक्षा अँड. सिंड्रेला परेरा यांनी यावेळी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत