राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथील डॉ.तनपुरे साखर कामगार वसाहतीत घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असून डुकरांनी उच्छाद घातला असल्याने नागरिक त्रस्त ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येथील डॉ.तनपुरे साखर कामगार वसाहतीत घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असून डुकरांनी उच्छाद घातला असल्याने नागरिक त्रस्त झाले. देवळाळी नगरपालिकेने कॉलनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे जिल्हा सचिव अजय खिलारी यांनी केली आहे.
राहुरी कारखाना कॉलनित घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजाराने नागरिक त्रस्त आहे. तसेच ठिकठिकाणी डुकरांनी उच्छाद घातला असल्याने नागरिक हतबल झाले आहे.
देवळाली नगरपालिकेला कारखाना परिसरातून लाखो रुपयांचा कर मिळत असताना स्वच्छता मोहीम राबवली का जात नाही असा सवाल अजय खिलारी यांनी उपस्थित करून नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कारखाना कॉलनीत स्वच्छता मोहीम राबवावी तसेच डुकरांचा बंदोबस्त करावा अन्यथा कॉलनीतील कामगार, महिला सर्वाना सोबत पालिकेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा अजय खिलारी यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत