राहूरीतील पत्रकाराच्या घरात गळफास घेण्याचा प्रयत्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरीतील पत्रकाराच्या घरात गळफास घेण्याचा प्रयत्न

राहुरी(वेबटीम) तू माझ्या घरात फाशी का घेत होता. दुसरीकडे कोठेही जाऊन फाशी घे. आम्हाला त्रास कशाला देतोस. असे विचारल्याचा राग आल्याने यातील आ...

राहुरी(वेबटीम)



तू माझ्या घरात फाशी का घेत होता. दुसरीकडे कोठेही जाऊन फाशी घे. आम्हाला त्रास कशाला देतोस. असे विचारल्याचा राग आल्याने यातील आरोपी विशाल गुप्ता याने पत्रकार मनोज साळवे यांना उद्धट भाषेत बोलून शिवीगाळ दमदाटी केल्याची घटना आज दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. 


          पत्रकार मनोज बळीराम साळवे, रा. जंगम गल्ली, राहुरी. यांचे जंगम गल्ली परिसरातील लखाई बोळ येथे भाडोत्री देण्यासाठी काही रूम आहेत. त्यापैकी एक रूम खाली असून ती उघडीच असते. या घटनेतील आरोपी विशाल पप्पू गुप्ता, रा. जंगम गल्ली, राहुरी. पर प्रांतीय तरूण दिनांक १४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान पत्रकार मनोज साळवे यांच्या लखाई बोळ येथील खोलीमध्ये घुसला. त्यावेळी त्याने छताच्या पत्र्याखाली असलेल्या बल्लीला दोरी बांधून फाशी घेण्याचा स्टंट करीत होता. आरोपी विशाल गुप्ता याने दोरी बांधून काही मित्रांना व्हिडीओ काॅल करून मी फाशी घेऊन आत्महत्या करीत आहे, असे दाखवीले. त्यावेळी त्याचे काही मित्र त्या ठिकाणी धावत गेले. मित्रांना येई पर्यंत तो थांबून राहिला. मित्र आल्याचे पाहताच त्याने गळफास घेण्याचा स्टंट केला. त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला खाली उतरवून खोली बाहेर काढले. 


         सदर खोली मालक पत्रकार मनोज साळवे यांना सदर घटनेची माहिती मिळाली असता त्यांनी आरोपी विशाल गुप्ता याला विचारले कि, तू विनाकारण माझ्या घरात येऊन फाशी का घेत होता. तूझे काही असेल तर दुसरीकडे जाऊन फाशी घे. तू इथे फाशी घेतली तर आम्हाला त्रास होईल. अशी विचारणा केली असता आरोपीने पत्रकार मनोज साळवे यांना उद्धट भाषेत बोलून शिवीगाळ व दमदाटी केली. 

        पत्रकार मनोज साळवे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगीतला. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल पप्पू गुप्ता, रा. जंगम गल्ली, राहुरी. याच्या विरोधात भादंवि कलम ५०६ प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवाजी खरात हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत