राहुरी(वेबटीम) उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बहुप्रतीक्षित अशा साईज्योती स्वयं सहाय्यता यात्रा व कृषी प्रदर्शन अ...
राहुरी(वेबटीम)
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बहुप्रतीक्षित अशा साईज्योती स्वयं सहाय्यता यात्रा व कृषी प्रदर्शन अहमदनगर येथे दिनांक १० ते १४ फेब्रुवारी २०२३ कालावधीत होणार असून सदर प्रदर्शानामध्ये एकुण ५०० स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. या वर्षी नागरिकांकडून खुप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असून ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता गटाच्या महिलांना आपली उत्पादने विक्री करण्याची फार मोठी संधी यामुळे मिळणार आहे.
आजतागायत राहुरी तालुक्यातील राहुरी पंचायत समितीच्या वतीने २१ स्वयं सहाय्यता समूहांनी खाद्य पदार्थ व इतर उत्पादित वस्तूंची विक्री करण्यासाठी नावांची नोंदणी केलेली असून तालुक्यातील उर्वरित स्वयं सहाय्यता गटानी आपली उत्पादने साईज्योती स्वयं सहाय्यता यात्रा व कृषी प्रदर्शनात विक्री करण्यसाठी सहभाग घ्यावा असे आवाहन राहुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी केले असून त्यांनी सदर प्रदर्शनात भाग घेण्यासाठी उमेद- तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत